उल्हासनगर (सोनू हटकर) : वड्यामध्ये पाल,समोशाच्या चटणीत उंदीर आणि आता मोतीचुरच्या लाडूमध्ये आळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात समोर आला आहे.
बदलापूर कात्रप परिसरातील मधुरम स्वीट या दुकानातून किरण मेढेकर या तरुणाने आपल्या मित्राच्या घरी बसलेल्या गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून मोतीचुरचे लाडू घेतले होते.मात्र खातांना त्यात आल्या आढळल्याचे आरोप किरण याने केला आहे.या प्रकरणी दुकानदाराला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.शिवाय या स्वीट मार्टच्या भटारखान्यात अस्वच्छता असल्याचा आरोप देखील किरण याने केला.यासंबंधी किरण याने अन्न औषध प्रशासन आणि पोलिसात तक्रार न करता हे लाडूमध्ये असलेल्या आळी चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.हे सगळे आरोप दुकानदाराने फेटाळले असून आमच्या दुकानातील गणपती च्या दिवशी सहा किलो लाडू विकले गेले त्यातील एकाच ग्राहकालाच का आळी आढळली तसेच किरण याने आपल्याकडे २० हजरांचा मागणी केल्याचा आरोप दुकानदाराने केला आहे.