महाराष्ट्र

रेल्वेप्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी केले जेरबंद

सोलापूर – मध्य रेल्वेमधून प्रवाशांचे मोबाईल पळवणाऱया एका संशयित चोरट्याला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने पकडले. त्याच्याकडून १ लाख ९,५०० रुपयांचे ११ मोबाईल जप्त केले आहेत. राजू मंच्छिद्र जाधव (वय २५, रा़ सेटलमेंट फ्री कॉलनी नं ६,सोलापूर) असे पकडण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. त्याला गुरुवारी मोबाईलसह ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संशयीत राजू जाधव हा रेल्वे डब्यांमधून इतर प्रवाशांबरोबर प्रवास करता-करता गर्दीचा फायदा घेवून त्यांचे मोबाईल चोरी करत होता. याची कुणकुण लोहमार्ग पोलिसांना लागली होती. गुरुवारी रेल्वे स्थानकावरच सापळा रचून त्याला पकडले. त्याच्या घराचीही झडती घेतली गेली. मात्र, त्याने घरामध्ये चोरीचे काही ठेवल्याचे उघडकीस आले नाही.

इतर गुन्हे उघडकीस यावेत आणि पोलीस कोठडी मिळावी यासाठी त्याला शुक्रवारी सोलापूर येथील दौंडच्या फिरत्या न्यायालयात हजर केले होते़. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कामगिरी केली. या कामगिरीचे पोलीस अधीक्षक दीपक साकोरे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले-पाटील यांनी सोलापूरच्या पथकाच्या कामगिरीचे कौतूक केले आहे. या कामगिरीत पोलीस हवालदार संजय जाधव, विश्वास वळकुटे, प्रकाश कांबळे, यांनी सहभाग नोंदवला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!