
दिवा (भरत पाटील) : ठाणे महापालिका अंतर्गत असणाऱ्या दिवा शहर व आजुबाजुच्या परिसरातील लोक दिवा पूर्व, स्टेशन परिसरातील तलावात गणपती विसर्जन करायचे. परंतु सद्य स्थितीला या तलावाची अवस्था खुपच दयनीय आहे. ह्या तलावात गणपती विसर्जन तर सोडूनच द्या. ह्या तलावाकडे बघु ही शकत नाही. एवढी दयनीय अवस्था झाली आहे.
संपूर्ण तलावात घाणीच साम्राज्य पसरलेलं असून, बर्याचश्या इमारतींचे सांडपाणी या तलावात सोडले जात आहे. अश्या तलावात गणपती विसर्जन करतो म्हणजे एक प्रकारची आपण आपल्या गणपतीची विटंबनाच करत आहोत. यास सर्वस्व जबाबदार हे, दिव्यातील आजी माजी नगरसेवक आहेत. असा आरोप भाजप युवा मोर्चा दिवा शिळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी केला आहे. दिवेकर पुढच्यावेळी अश्या कुचकामी आणि निष्क्रिय नगरसेवकांचे विसर्जन केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. नगरसेवक पदी निवडुन येवुन दिड वर्ष झाली. यांनी आपल्या वचननाम्यात दिलेल्या दिवा तलाव सुशोभीकरणांचा सत्ताधारी नगरसेवकांना विसर पडलेला दिसतोय असा टोलाही त्यांनी लगावला .
अश्या तलावात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यापेक्षा निदान ठाणे महापालिका प्रशासनाने ठाण्या प्रमाणे कृत्रिम तलाव तयार करून दिवेकरांना दिलासा द्यावा. अशी मागणी भाजप युवा मोर्चा दिवा शिळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी ठाणे महापालिकेला दिलेल्या पत्रात केली आहे..