महाराष्ट्र

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच स्कॅनिंग व एमआरआयची सुविधा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धुळे, दि. १६ : सर्वसामान्य नागरिकाला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एमआरआय आणि स्कॅनिंगची सुविधा येत्या महिनाभरात करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण,जलसंपदा लाभ क्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाजवळील मैदानावर आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल,खासदार डॉ. हीना गावित, आमदार स्मिता वाघ, अनिल गोटे, सुरेश भोळे,वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, डॉ. कुलदीप कोहली, डॉ. रागिणी पारेख, डॉ.रामराजे आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, शासकीय आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येतात.मात्र सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी श्री. महाजन यांनी शासकीय व खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांची परंपरा सुरू केली आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्यसेवा रुग्णांच्या घराघरापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. गरीब व गरजू रुग्णांवर पूर्णपणे मोफत वैद्यकीय तपासणी,औषधोपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून करण्यात येतात. आतापर्यंत 25 लाख रुग्णांना आरोग्य शिबिराचा लाभ झाला आहे.केरळमध्ये पूर आला असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली तेथे सर्वांत मोठे आरोग्य शिबिर घेत आरोग्य सेवा पोहोचविली. सर्वात मोठे आरोग्य शिबिर महाराष्ट्राचे होते, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महिन्यापासून ‘आयुष्यमान भारत’योजना कार्यान्वित करण्यात येईल.या योजनेंतर्गत देशातील सुमारे 50कोटी जनतेला पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या आरोग्य सेवा पुरविण्यात येतील. या योजनेत ज्यांचा समावेश होणार नाही,त्यांच्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवित प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवेच्या कक्षेत आणण्यात येईल.

धुळे शहराच्या नियोजनबद्ध रचनेचा उल्लेख करून ते म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विकासकामांची मालिका शहरात राबविण्यात येईल.त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अक्कलपाडा धरणावरील 120 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात येईल. यामुळे धुळेकरांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. धुळे शहराचा चेहरा- मोहरा बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन म्हणाले, देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू, गरीब रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात येत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावरील औषधोपचार आणि आवश्कता भासल्यास शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्रपणे पाठपुरावा केला जातो. शिबिरात देशातील नामवंत शल्यचिकित्सक,शल्यविशारद सहभागी झाले आहेत.त्यामुळे रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळू शकणार आहे.

मुख्यमंत्र्यांना राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी आहे.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर आरोग्य शिबिराची संकल्पना आकारास आली. एवढेच नव्हे, तर गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक् मदत करण्यात येते. शिबिराच्या माध्यमातून किमान 30 हजार गरजू रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी व्हेंटिलेटर असलेल्या दोन सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही ते म्हणाले.

रोहयो मंत्री श्री. रावल म्हणाले, अटल महाआरोग्य शिबिराचा क्षण धुळेकरांसाठी ऐतिहासिक असून तो सुवर्णाक्षरात नोंदविण्यासारखा आहे.आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांपर्यंत जगातील अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. महिला,गरीब रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून श्री. महाजन यांनी मोठे काम उभे केले आहे. गेल्या वर्षी नंदुरबार येथे आरोग्य शिबिराचा अनेक गरजूंना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यात मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून आतापर्यंत पाच लाख रुग्णांवर मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याचे पद्यश्री डॉ. लहाने यांनी प्रास्ताविकात सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णांना प्रातिनिधीक स्वरुपात दातांच्या कवळीचे वाटप करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर नाईक यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

…त्या क्षणाचा आनंद अधिक

राज्य शासनाच्या वतीने हजारोबालकांची टॉकलिअर इन प्लांटशस्त्रक्रिया करण्यात आली आहे.या शस्त्रक्रियेसाठी आठ लाखरुपये खर्च येतो. त्यामुळे ही बालकेआज ऐकू आणि बोलू शकतात.हृदय शस्त्रक्रिया केलेली काहीबालके पालकांसह मला सांगलीयेथे आनंदाने भेटली. त्यांनी‘मुख्यमंत्री काका, तुम्ही आम्हालावाचविले’ असे सांगितले. त्यामुळे‘मुख्यमंत्री झालो, त्यावेळच्याआनंदापेक्षा अधिक आनंद यावेळीझाला’, असेही मुख्यमंत्रीमहोदयांनी यावेळी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!