
नवी मुंबई (सुर्यकांत गोडसे ) – आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी वाशी येथील विष्णुदास भावे, नाट्यगृह येथे नवी मुंबईतील सर्व व्यापारी, व्यापारी संघटना, व्यापारी संस्था, हॉटेल व्यावसायिक, लघु व्यापारी, दुकानदार यांच्या समस्या जाणून घेणेकरिता बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भाजपानवी मुंबई प्रभारी संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, ग्रोमा हाऊसचे अध्यक्ष शरद मारू, सहसचिव भीमाजी भानुशाली, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजणे, मोहन गुरनानी, नरेश राजपुरोहित, नवी मुंबई मर्चंन्ट्स चेंबरचे अध्यक्ष कीर्ति राणा,हॉटेल असोशिएशन चे अध्यक्ष दयानंद शेट्टी, फूलचंद जैन, प्रमोद जोशी, पोलीस निरीक्षक नितीन गीते, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे,नगरसेवक दीपक पवार, सुनील पाटिल, विकास झंझाड तसेच सिडको, महापालिका, एम.एस.ई.बी, पोलिस प्रशासनाकडून संबंधित अधिकारी व मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होते. यावेळी अनेक व्यापारी मान्यवरांनी आपल्या समस्या व मागण्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे व उपस्थित अधिकारी वर्गांसमोर कथन केल्या. उपस्थित विविध विभागातील अधिकाऱ्यांनीही सोडवणूक शक्य असलेल्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात येणार असून उर्वरित समस्याही विशिष्ट बैठक घेऊन सोडविण्यात येण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील व्यापारांच्या समस्या या आजच्या नसून त्या गेल्या 25 ते 30 वर्षापूर्वीपासून प्रलंबित असून त्यांच्याकडे कुठल्याच नेत्यानी लक्ष न दिल्यामुळे व्यापारी वर्ग आज या समस्यांना तोंड देत आहे. स्थानिक व्यापारी दुकानदार घटक हा नवी मुंबईतील कर दाता असून त्यांचे प्रश्न सोडविण्यात आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगून यावेळी भेडसावणाऱ्या विविध समस्या नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यानसमोर मांडल्या. ज्या समस्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सोडवणूक शक्य असेल त्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात येणार असून धोरणात्मक निर्णयाच्या मागणी करिता या सर्व व्यापाऱ्यांसमवेत राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांससह बैठक आयोजित करणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. सणासुदीचा दिवस असूनसुद्धा आज बैठकीस इतका मोठा व्यापारी वर्ग उपस्थित राहिलेला पाहून आनंद वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.