डोंबिवली :- ( शंकर जाधव ) परिस्थिती बेताची असल्याने आजही ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अश्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खारीचा वाटा म्हणून त्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे काम यावर्षी डोंबिवली पश्चिमेकडील अचानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले.एवढेच नव्हे मंडळाच्या वतीने भाविकांचे मोफत प्रधानमंत्री अपघाती सुरक्षा विमा काढण्यात आल्याचे मंडळाने अध्यक्ष सुजित महाजन यांनी सांगितले.
अचानक मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे २७ वर्ष आहे.अध्यक्ष सुजित महाजन, उपाध्यक्ष सतीश सोनावणे, खजिनदार राजू म्हात्रे, सल्लागार श्रीकांत बिरमुळे यासह अभय खेडेकर, संजय पाटील, अनिल गायकवाड, आदर्श सिंग, धूव मेहता, अमोल जाधव, स्वप्नील राजल , दीपक ओझा आणि अनेक कार्यकर्ते अथक मेहनत घेत असतात. मंडळाच्या मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,मोफत आधारकार्ड, आधार कार्ड दुरुस्ती यावर्षी करण्यात आली. आरोग्य तपासणी,मोफत नेत्र चिकित्सा शिबीर,बालरोग चिकित्सा शिबीर घेण्यात होते.विद्येची देवता गणपती बाप्पाच्या चरणी फुले अर्पण न करता त्या किंमतीत एक वही आणि पेन अपर्ण करा, जमा झालेल्या वह्या आणि पेन्स आदिवासी भागातील गरीब विद्यार्थ्यांना देऊ. जेणेकरून इच्छा असूनहि परिस्थितीमुळे त्याच्या शिक्षणात खंड पडता कामा नये असे यावेळी अध्यक्ष सुजित महाजन यांनी सांगितले. अचानक मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या वर्षी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. गणपती सजावट स्पर्धेत दरवर्षी या मंडळाला पारितोषिक मिळते. पोलिसांकडूनही या मंडळाला प्रशस्तीपत्रक दिले जाते.अनेक भाविक मंडळाच्या गणपतीकडे नवस करतात. नवस पूर्ण करण्यासाठी काही भाविक तर गणरायाच्या चरणी सोन्याचे दागिने अर्पण करतात.