क्रिडा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, दि. 18 : इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत वॉटर रोइंगमध्ये सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राची शान वाढविल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामधील तळेगाव रोही येथील दत्तू भोकनळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आजारी असतानाही श्री. भोकनळ यांनी यश संपादन केल्याने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांचे कौतुक करून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. येणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर,जगनअण्णा पाटील, अर्जुन कटपाल,बाळासाहेब पाटील, कुणाल वाघ उपस्थित होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत क्वाड्राप्ले स्कल्स सांघिकमध्ये सुवर्णयश मिळविले आहे. क्वाड्राप्ले स्कल्सच्या अंतिम फेरीत दत्तूच्या संघाने 6 मिनिटे 17.13 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. तसेच यापूर्वी 2016 मध्ये ब्राझील देशातील रिओ येथे झालेल्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले होते व राष्ट्रीय स्पर्धेत तीन वेळेस सुवर्णपदक, 2014 मध्ये कोरिया येथे एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत मेन्स डबल स्कल्स प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!