उल्हासनगर : (सोनू हटकर) उल्हासनगरात ट्रॅफिक पोलिसावर एका तरुणानं हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात रावसाहेब काटकर हे पोलीस कर्मचारी जखमी झाले असून हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
उल्हासनगरमधील ओ-टी सेक्शन येथील तीन रस्त्यावर कर्तव्यावर असताना रावसाहेब काटकर यांनी भरधाव वेगाने येणाऱ्या आप्पा मुंडे नावाच्या तरुणाला अडवलं होतं.यामध्ये दोघांमध्ये
झालेल्या वादातून रावसाहेब काटकर यांच्या कानशिलात लगावली .हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी अप्पा मुंडे विरोधात विठ्ठलावाडी पोलीसांनी अटक केली आहे.