मुंबई, दि. 19 : कोरियातील भारतीय राजदूत अतुल गोतसुर्वे तसेच केनियातील भारताचे उप-उच्चायुक्त राजेश स्वामी यांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्र शासन उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी नवीन उद्योग धोरण राबवित असून त्याद्वारे परदेशातील कंपन्यांना अधिक गुंतवणूक करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देत आहे. केनिया आणि कोरियासारख्या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज श्री. देसाई यांनी व्यक्त केली. निर्यात वाढविण्यासाठी स्वतंत्र निर्यात केंद्र सुरू करण्याची सूचना श्री . देसाई यांनी केली.
महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय असल्याची बाब या अधिकाऱ्यांनी नमूद केली तसेच भविष्यात उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी सामान्य प्राशासन विभागाचे सचिव शिवराज दौंड तसेच उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.