शहापूर : शिवसेना युवा नेते श्री.अविनाश साबळे वाढदिवसा निमित्त जि.प. सदस्या सौ.कांचनताई अविनाश साबळे यांच्या जि.प.निधितुन मंजुर केलेल्या गुरुकुल नगर (किन्हवली) कुंभईचिवाडी, पारधवाडी, ठुणे, येथील अंतर्गत रस्ता, कुंभईची वाडी येथील शाळेला सौरक्षण भिंत अशा विकासकामांचे भुमीपुजन युवानेते अविनाश साबळे ,शिवसेना उपतालुकाप्रमुख विकासजी गगे, बाळा विशे, विभागप्रमुख लक्ष्मण बांगर, मिलिंद यशवंतराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संदीप निमसे, काळुराम बांगर, संजय बांगर, दिनेश सपाट, स्वप्नील भेरे, तुकाराम बांगर, किशोर धानके, नरेश देशमुख, दिपक पडवळ व गणेश चौधरी इत्यादि शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थांनी, शिवसैनिकांनी व मित्रपरिवाराने युवानेते अविनाशजी साबळे साहेबांच्या कार्याबद्दल भरभरून कौतुक केले तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.