ठाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारत देश विकासामुळे मनसैनिकांचा भाजपात प्रवेश……

डोंबिवली :- ( शंकर जाधव ) देशातील प्रत्येक गावाचा, शहराचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने पंतप्रधान नरेद्र मोदींनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. भाजप हा देशाचा विकास करू शकतो यावर विश्वास ठेऊन याचे कौतुक अनेक राजकीय पक्षाकडून केले जाते. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात दिवसेंदिवस होत असलेल्या विकासाचेही कौतुक केले जात आहे. भाजपचा देशाचा विकास करून जगात देशाचे नाव अधिकाधिक उंच करू शकतो असे सांगत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काही मनसैनिकांनी भाजपचा झेंडा हाती घेऊन प्रवेश केला.

डोंबिवली शहर उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांच्या संपर्कात असलेल्या विक्रांत जोशी, श्रद्धा जोशी, सुनील नेवासकर, कुणाल नागोटकर, अजय शर्मा, कल्पेश पवार, विनय जोशी, अमोल सावंत, विशाल काळे, अश्विन कुमार राहाते,राहुल फाटक, मंगेश मोघे, कृष्णा पवार, नरेश म्हात्रे, सुनील महाले, अमोल मोरे, चिन्मय चव्हाण, गणेश गायकवाड यासह अनेक मनसैनिकांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसादिनी जाहीर भाजपात प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी त्यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि केंद्र सरकार,राज्य सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यत पोहोचवा असे सांगतिले.तर यावेळी विक्रांत जोशी म्हणाले, आज प्रत्येकाचे स्वप्न आहे कि देशाचा विकास व्हावा , यासाठी धैर्य, कुशलता आणि कृती ही तत्वे भाजपात दिसून येतात. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि डोंबिवलीत रविंद्र त्यामुळे या पक्षात असल्याचे मलाही देशाचे भले करायचे आहे.श्रद्धा जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हिताबाबत जे धोरण ठेवले आहे ते आम्हाला आवडले आहेत. आमच्यात जी क्षमता आहे त्याचा फायदा समाजाला करून द्यावा, मनाने समाजकारण करताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले.माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर म्हणाले,आधी राष्ट्र , मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः या तत्वानुसार चालणाऱ्या भाजपात विक्रांत जोशी आणि अनेक मनसैनिकानी प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताच्या रचनेसाठी जे स्वप्न पहिले, ते साकार करण्यासाठी याच्या हातभार लागेल.कार्यकर्ता म्हणून त्याची कार्यकुशलता पाहून त्यांना जबाबदारीचे पद दिले जाईल.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!