
कोकण(शांत्ताराम गुडेकर) : प्रगती ही पैशात नसते तर ती आपल्या विचारात असते आणि समाजाला गरज आहे ती कुशल आणि संघटीत विचारांची.अशाच नवनवीन विचारांच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) -खेड दापोली तालुका विभाग आयोजित १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन, माजी सैनिक, पोलीस, डॉक्टर व पुरस्कृत व्यक्तींचा सन्मान सोहळा कोकणात या वर्षी प्रथमच संघटनेतील खेड दापोली तालुका विभागातील पदाधिकारी यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून गौरी आगमनाच्या दिवशी १५ सप्टेंबर २०१८ या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते युवा उद्योजक श्री. रमेशजी नाचरे, राष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. सुरेशजी नेवरे, कुणबी युवक मंडळ दापोली तालुका उपाध्यक्ष श्री.मनिषजी लोंढे, उनव्हरे १८ गाव युवा अध्यक्ष श्री. विशालजी मोरे, शिवशक्ती बाळ मित्र मंडळ बहिरवली गाव ग्रामीण अध्यक्ष श्री. गणपतजी भागणे, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख श्री. राजेंद्रजी भुवड, १२ गाव कुणबी समाज अध्यक्ष श्री. अनंत गोरीवले,बहिरवली गावचे गावकर श्री. महादेव पा. भागणे व सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर व ग्रामीण भागातील सरपंच, हायस्कूल मधील शिक्षक, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहिले होते.तसेच सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी श्री. सुनीलजी डिके हे या कार्यक्रमासाठी खास करून पुण्यावरून आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून झाली त्यानंतर आंबेनळी घाटात दुर्दैवी अपघात होऊन दापोली कृषी विद्यापीठातील ३२ कर्मचारी यांचे अपघाती निधन झाले होते त्या समाजबांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्वागत गीताने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नंतर मनोरंजनाचा कार्यक्रम शिवशक्ती बाल मित्र मंडळ बहिरवली भागणेवाडी या जाखडी नृत्यकलेने आपले सादरीकरण करून अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संघटनेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार , सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार, डॉक्टर, माजी सैनिक व पोलिस या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नंतर १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर मनिषजी लोंढे व विशालजी मोरे या प्रमुख पाहुण्यांनी समाजबांधवांना व विध्यार्थ्यांना अतिशय उत्तमरित्या मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष -श्री रमेशजी नाचरे यांनी आपले विचार मांडले.या कोकणातील ग्रामीण भागात झालेल्या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य शिव-शक्ती बाल मित्र ग्रामस्थ मंडळ बहिरवली भागणेवाडी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर सरचिटणीस-श्री. राज भागणे,आणि पर्वती विभाग चिटणीस-प्रदीप खांबे यांनी केले.सर्व आयोजक टीमचे, व कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार माणून शेवटी कार्यक्रमाची सांगता केली.