भारत

भर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या

आंध्रप्रदेश 23 सप्टेंबर : आंध्रप्रदेशात माओवाद्यांनी एका आमदार आणि माजी आमदारासह दोन जणांची धारदार शस्ञांनी हत्या केली आहे. विशाखापटणम जिल्हयात तेलुगू देशमचे आमदार किडारी सर्वैश्वरराव आणि माजी आमदार सोमु दोघांना जनसंपर्क दौ-यावर असताना कार्यकर्त्यासमक्ष गोळया घालुन ठार करण्यात आलं आहे. त्यांना मारण्यासाठी तब्बल 50 माओवादी त्या ठिकाणी उपस्थित होते.

या घटनेमुळे संपूर्ण आंध्रप्रदेश हादरून गेला आहे. दंबारीकुडा परिसात जनसंपर्क कार्यक्रमासाठी गेले असता 50 सशस्त्र माओवाद्यांनी आमदाऱ्यांचा ताफा अडवला. त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बंदुकीची धाक दाखवत लांब पाठवलं आणि सगळ्यांदेखत गाडी खाली उतरवून या दोन्ही आमदारांवर गोळ्या झाडण्यात आल्या. आज दुपारी 1 वाजता ही घटना घडली आहे.

दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये बॉक्साईडच्या काही खाण्यांचं उत्खनन होणार होतं पण त्याला माओवाद्यांचा विरोध होता. त्यामुळे या सगळ्याचा बदला घेण्यासाठी या दोन आमदारांवर भर रस्त्यात मारण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटना घडताच पोलीस आणि स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर आता नेमकं काय घडलं याचा पोलीस तपास करत आहेत.

पण आमदारांना अशा भर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी गोळ्या झाडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!