साहित्य

आपलं मंत्रालय’ च्या सप्टेंबरच्या अंकाचे सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 24 : ‘आपलं मंत्रालय’च्या सप्टेंबरच्या अंकाचे प्रकाशन रोजगारहमी योजना, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवलेयांच्या हस्ते आज येथे करण्यातआले. या अंकाचे अतिथी संपादक श्री. डवले आहेत. यावेळी  संचालक अजय अंबेकर, शिवाजी मानकर,संपादक सुरेश वांदिले, कार्यकारी संपादक मीनल जोगळेकर आदीउपस्थित होते.

आपलं मंत्रालयचा हा अंक आकर्षक व वाचनीय झाला असल्याचे गौरवोद्गार श्री. डवले यांनी काढले.मंत्रालयीन प्रत्येक अधिकारी,कर्मचाऱ्याने हा अंक आवर्जून वाचावाआणि आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन त्यांनी केले.

या अंकात गणेशोत्सव, गौरीचापारंपरिक खेळ, बैलपोळायाविषयीच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाची काही निवडक छायाचित्रे  हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर मंत्रालयीनकर्मचाऱ्यांचे अनुभव, कथा,कवितांचाही अंकात समावेश करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!