मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) : सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) -खेड दापोली तालुका विभाग आयोजित १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन, माजी सैनिक, पोलीस, डॉक्टर व विवाध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तींचा सन्मान सोहळा मु.बहीरवली(भागणेवाडी),ता.खेड,जि.रत्नागिरी येथील सोमेश्वर मंदिर,शिवशक्ती बाळ मित्र मंडळ येथे संघटनेतील खेड दापोली तालुका विभागातील पदाधिकारी यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकणात प्रथमच आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते युवा उद्योजक रमेश नाचरे, राष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेश नेवरे, कुणबी युवक मंडळ दापोली तालुका उपाध्यक्ष मनिष लोंढे, उनव्हरे १८ गाव युवा अध्यक्ष विशाल मोरे, शिवशक्ती बाळ मित्र मंडळ बहिरवली गाव ग्रामीण अध्यक्ष गणपत भागणे आदी मान्यवर उपस्थितीत होते.या गौरव सोहळ्यात कोकण भुमिपुत्र मुंबईतील रहिवाशी समाजसेवक राजेंद्र स.भुवड यांचा “सामाजिक कार्यकर्ता “पुरस्कार-२०१८ देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.राजेंद्र भुवड यांनी हा पुरस्कार आपली पत्नी सौ.पुजा रा. भुवड यांच्यासह स्विकारला.राजेंद्र भुवड यांचा जाहीर सत्कार झाल्याबद्दल कोकण भुमिपुत्र मोहन कदम,दिपक कारकर यांच्यासह भुवड यांच्या मित्रपरिवार यांनी त्यांना अभिनंदनासह शुभेच्छा देत कौतुक केले आहे.