
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) लाखो रुपये खर्च करून कल्याण-डोंबोवलीतील डोंबिवलीतील सुनील नगर परिसरात कल्याण डोंबिवली महापालिकेने लाखो रुपये खर्च करुन महिलांसाठी व केंद्र उभारण्याच्या उददेशाने `महिला भवन` बांधले. पण गेली दहा वर्षे ही वास्तू धूळ खात पडली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका महिला भवनाला बसत आहे.महिला भवनाचा उपयोग महिला करत नसल्याने अखेर प्रशासनाने त्या रिकाम्या जागेत ‘फ`प्रभागाचे कार्यालय हलवण्याच्या घाट घातला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने २०११ साली लाखो रुपये खर्च करुन सुुुदर वास्तू बांधली होती. याठिकाणी ३० खोल्या असून सध्या केवळ एका खेालीत राज्य शासनाच्या भू-मापन विभागाचे कार्यालय आहे. बाकी इतर खाल्या रिकाम्या असून सर्वत्र धुळीचे साम्रज्य पसरले आहे.या वास्तूत कोणाचाही वावर नसल्याने सर्वत्र कचरा साठला आहे बाजूलाच आमदार सुभाष भेाईर यंानी सुंदर कवियत्री बहिणाबाई उद्यान तयार केले आहे. बाजूला महिला भवनाची सुंदर वास्तू उभी आहे.महिला बचत गट व केंद्र उभारता यावे या उददेशाने ही पाॅॅश वास्तू बांधण्यात आली आहे.२०११ मध्ये मोठा गाजावाजा करुन या वास्तूचे उदघाटन करण्यात आले. मात्र त्यानंतर कोंणीही महिला या ठिकाणी फिरकलेले नाही.महापालिकेत सुमारे ६५ महिला नगरसेविका निवडून आल्या असल्या तरी त्यापैकी किती नगरसेविका तेथे फिरकल्या हे माहित नाही.डोंबिवलीत विविध महिला बचत गट व विविध महिला संस्था कार्यरत आहेत.पण कोणीच याकडे गेल्याचे वा या वास्तूचा वापर करत नसल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या पुढाकाराने महिला भवन बांधण्यात आले. पण समितीच्या सदस्याहीे या ठिकाणी गेल्याचे आढळून येत नाही.आणि या वास्तूचा येाग्य प्रकारे उपयोग करावा यासाठी प्रशासनाने पण कोणतेहीे धोरण तयार केेले नाही यामुळे लाखो रुपये खर्च करुन बांधलेली उमारत धूुळ खात पडून आहे.महिला भवनाचा उपयोग महिला करत नसल्याने अखेर प्रशासनाने त्या रिकाम्या जागेत ” फ ”प्रभागाचे कार्यालय हलवण्याच्या घाट घातला आहे. ”महिला भवन इमारतीत महिलांसाठी समुपदेशन केंद्र ,तसेच महिला सक्षम व्हाव्यात म्हणून उद्योगासाठी प्रिशक्षण देण्याचा प्रयत्न चालू असून प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे.व लवकरच महिलांसाठी विविध उपक्रम सुरु होतील असे दिपाली पाटील,महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दिपाली पाटील यांनी सांगितले