आरोग्यदूत मुंबई

चांगल्या आरोग्य सेवेला प्राधान्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. २६ : लोकप्रतिनिधींनी जनतेला रस्ते, पाणी आदी मूलभूत सुविधा देतानाच चांगल्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. सेंट जॉर्ज रुग्णालयातील अत्याधुनिक सिटी स्कॅन विभागाचे लोकार्पण श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सेंट जॉर्ज रुग्णालयातील अत्याधुनिक सिटी स्कॅन सयंत्रासोबत लिंगपरिवर्तन, कॉस्मॅटिक विभाग तसेच रोटी सयंत्राचे उद्घाटन श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित,आमदार राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, सेंट जॉर्ज रुग्णालयात सिटी स्कॅन विभाग सुरू झाल्याने रुग्णांना दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत. मुंबईतील जनतेला याचा विशेष लाभ होणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून मुंबईतील चार रुग्णालयांना तीन वर्षांत ८५ कोटींचा निधी दिला असून सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी सात कोटींचा निधी दिला आहे. मागणीप्रमाणे येत्या काळात एमआरआय मशीनसाठी निधी देण्याचे आश्वासन श्री. देसाई यांनी यावेळी दिले.

रुग्णांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री खरेदीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने द्यावा. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल,असेही आश्वासन यावेळी श्री. देसाई यांनी दिले. आरोग्यसुविधांमुळे रुग्णांचे प्राण वाचावेत,व्हिलचेअरवरून आलेल्या रुग्णांनी ठणठणीत बरे होऊन घरी जावे, ही आमची भावना असल्याचे देसाई यांनी नमूद केले. अत्याधुनिक सयंत्रामुळे सेंट जॉर्ज रुग्णालय जे. जे. रुग्णालयाच्या बरोबरीत आल्याचेही त्यांनी सांगितले.

पन्नास लाखाहून ८५ कोटींचा निधी रुग्णालयांना प्राप्त करून दिल्याबद्दल खासदार अरविंद सावंत यांनी पालकमंत्री श्री. देसाई यांचे आभार मानले. कॉस्मॅटिक सर्जरी करणारे सेंट जॉर्ज हे देशातील पहिले सरकारी रुग्णालय असून लवकरच हे रुणालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होईल, असा विश्वास खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले,समाजाच्या अडचणी दूर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी या रुग्णालयाला अत्याधुनिक सयंत्र देण्यात आले. सिटी स्कॅन मशीन मिळाल्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. रोटी मशिनमुळे रुग्णालायत येणाऱ्या रुग्णांना तात्काळ भोजन मिळणार आहे. मुंबईसह बाहेरील रुग्णांना या सेवेचा फायदा होणार आहे.

डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रस्ताविक केले. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयात सिटी स्कॅन विभाग सुरू झाला. या विभागासाठी सुरुवातील सहा कोटींचा निधी प्राप्त झाला होता. परंतु एक कोटींचा निधी कमी पडत होता. श्री. देसाई यांनी तत्काळ हा निधी मंजूर केला. त्यामुळे हा विभाग आज सक्रिय झाला. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीडीसी) रुग्णालयांना दोन कोटी रुपये मिळत होते. परंतु देसाई यांच्या प्रयत्नामुळे तीन वर्षात चार रुग्णालयांना तब्बल ८५ कोटी रुपये मिळाल्याचे लहाने यांनी नमूद केले.

यावेळी आमदार राज पुरोहित यांनी रुग्णालयात सेवा करणाऱ्या डॉक्टर,परिचारिका व कर्मचाऱ्यांचा कार्याचा गौरव केला. तसेच हे रुग्णालय गोल्डन हॉस्पिटल म्हणून ओळखले जाईल असे सांगितले. सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक मधुकर गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!