डोंबिवली :- ( शंकर जाधव ) दिवा पनवेल मार्गावरील नावडे रेल्वे स्थानक अतिशय घाण झाली होती. त्या स्थानकावर पुरुषभर उंचीचे गवत वाढले होते येत्या २ आॅॅक्टोबर पूर्वी रेल्वे स्थानके स्चच्छ करण्याचा निर्धार रेल्वे प्रशासनाने केला असून त्या अंतर्गत नावडे येथील कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थी,व शिक्षकांनी रेल्वे स्थानकावरील गवत काढून रगरंगोटी करुन नावडे स्थानकाचे रुपडे पालटून टाकले. मध्य रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता व त्याच्या विभागाने यासाठी पुढकार घेतला होता या स्वच्छता मोहिमेत पी जे म्हात्रे कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थी,सहा शिक्षकांनी गवत काढण्याचे स्टेशनला रंगरंगोटी देण्याचे काम उत्साहाने केले.स्वच्छता मेाहिमेबददल रेल्वेने नावडे कनिष्ठ महाविद्यालयाला प्रशस्तिीपत्र दिले.
दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील नावडे स्थानकाची विद्यार्थ्यानी केली सफाई
