मुंबई

मुंबईतील प्लास्टिक गोदामांवर धाडी; हजारो किलो प्लास्टिकचा माल जप्त

मुंबई, दि. 26 : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने मुंबईतील मालाड, चिंचबंदर,मस्जिद बंदर या ठिकाणी प्लास्टिकच्या गोदामांवर धाडी टाकून हजारो किलो प्लास्टिकचा माल जप्त केला.

भरारी पथकाने अजंठा ट्रान्सपोर्ट,मालाड, पूर्व या गोदामावर कारवाई करुन बंदी असलेला एकूण १ हजार ३५९ किलो प्लास्टिक माल जप्त केला. तसेच या गोदामाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षक, दिंडोशी यांना पुढील कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले असून हा माल ट्रकद्वारे गुजरात मधून आणल्याचे आढळून आले.

तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भरारी पथक व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत मुंगीपा रोडवेज प्रा.लि., चिंचबंदर या गोदामावर धाड टाकली असता तेथील गोदामांमध्ये नॉन ओव्हन पॉलिप्रॉपिलीन व प्लास्टिक पी.पी.बॅग्स (50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या) साठवलेल्या आढळून आल्या. हा माल 1 हजार 3 कि.ग्रॅ. इतका असून गोदामाचे सहाय्यक व्यवस्थापक महावीर ओंकारमल शर्मा यांना पाच हजार रुपये दंड करण्यात आला. याच भरारी पथकाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत मस्जिद बंदर मुंबई येथे एका दुकानावर कारवाई केली असता या ठिकाणी ४ हजार कि.ग्रॅ. वजनाचे प्लास्टिक पॅकेजिंग, बॅगने भरलेले आढळले. हा माल दमण, गुजरात येथून आणल्याचे दिसून आले. या मालावर इपीआर नंबर नसल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत तो जप्त करण्यात आला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!