डोंबिवली – ( शंकर जाधव )
शहरात सिग्नल यंत्रणेबाबत पालिका प्रशासनाकडून निधीच्या आकडेवारीचा खेळ मांडत कागद रंगवली जात असून अद्याप सिग्नल यंत्रणेबाबत निर्णय होऊ शकला नाही .याबाबत वाहतुक पोलिसांनी पुढाकार घेत शहरातील महत्वाच्या आशा ५९ ठिकाणी सिग्नल यंत्रणेसाठी स्पॉन्सर आहेत, परवानगी द्या अशा आशयाचे पत्र पालिकेला धाडले होते. मात्र पालिका प्रशासनाकडून तीन महिने उलटूनही या पत्राला उत्तर देण्याची तसदी घेन्यात आली नसल्याचे उघड झाले आहे .याबाबत वाहतूक शाखेचे डीसीपी अमित काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालिका प्रशासनाला पत्र पाठवले असून अद्याप उत्तर आले नसल्याचे संगीतले.
कल्याण – डोंबिवलीतील शहरांतर्गत वाहतुकीला शिस्त लागावी आणि शहरांतर्गत रस्त्यांवर आलेला वाहतुकीचा भार कमी करावा यासाठी कल्याण डोंबिवलीत तातडीने सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे .मात्र पालिका प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणेसाठी दरवर्षी निधीच्या आकडेवारीचा खेळ मांडला जात असून कागद रंगवत आश्वासन दिली जातात .एकीकडे वेळी अवेळी होणारी अवजड वाहनाची वाहतूक ,पत्रिपुल बंद,वाढलेली वाहनांची संख्या,बेशिस्त वाहनचालक ,यामुळे कल्याण डोंबिवली कर वाहतूक कोंडी मुळे पिचले असताना प्रशासन मात्र कागदी मनोरे रचण्यात व्यस्त असून याबाबत ठोस निर्णय होऊ शकलेले नाही .याबाबत वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत काही स्पॉन्सर च्या माध्यमातून शहरातील महत्वाच्या अशा ५० ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्याची तयारी दाखवत याबाबत परवानगी साठी पालिका आयुक्तना पत्र धाडले होते .पत्र देऊन तब्बल तीन महिने उलटले मात्र याबाबत चर्चा सोडाच पण साधे उत्तर देण्याची तसदी पालिका प्रशासनाने घेतली नसल्याने पालिकेची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे .शहरातील वाहतूक कोंडीमुळे करदाते नागरिक वाहनचालक जेरीस आले असताना निधीअभावी कामे होत नसल्याने कल्याण डोंबिवलीकर निमूटपणे सहन करत होते .मात्र एखादा स्पॉन्सर मिळूनही पालिका प्रशंसन उदासीनता दाखवत असेल तर नागरिकांच्या त्रासाचे प्रशासनाला सोयरे सुतक नसल्याची संतप्त प्रतिक्रिया जनमानसातुन व्यक्त केली जात आहे.