डोंबिवली :- ( शंकर जाधव) अनैतिक संबंधाला पतीने विरोध केल्याने संतापाच्या भरात पत्नीने आपल्या पोटच्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीला गळा दाबून जीवे ठार मारल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील भोपर परिसरात घडली.
मानपाडा पोलीस स्थानकात निर्दयी आई पूजा प्रसाद हिच्या विरोधात गुन्हा दखल करत तिला अटक केली आहे. मुळचे उत्तरप्रदेशचे असणारे ननकण प्रसाद व पूजा प्रसाद हे दाम्पत्य डोंबिवली पूर्वेकडील भोपर येथील विठाबाई चाळीत राहत होते .त्यांना एक वर्षाची मुलगी होती .पूजा हिचे अनैतिक सबंध असल्याची कुणकुण ननकण याला लागली होती .त्यातून या दोघामध्ये अनेकदा वाद होत असत ननकण याने अनैतिक सबंधाला विरोध केल्याने पूजा संतापली होती.पती पत्नी मध्ये वाद झाल्यावर संतापाच्या भरात पूजा ने तिच्या पोटच्या १ वर्षच्या चिमुकली आरतीचा गळा दाबून निर्दयतेने हत्या केली. हे कृत्य कुणाला माहित पडून नये म्हणून तिने या चिमुकलीचा मृतदेह मोकळ्या जागेत वाढलेल्या गवतात फेकून दिला .हा प्रकार ननकण यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी पूजा विरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.