डोंबिवली:- ( शंकर जाधव ) रोटरी स्कूल ऑफ डेफच्या वतीने २८ सप्टेंबर जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त डोंबिवलीत काढलेल्या पर्यावरण जनजागृती रॅलीतून कल्याण –डोंबिवली प्लास्टिकमुक्त करा असा संदेश दिला. यावेळी सुमारे १०० कर्णबधीर विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी या विद्यार्थ्यांनी इंदिरा चौकात पथनाट्य सादर केले.
रोटरी स्कूलपासून सुरुवात झालेल्या रॅलीचा श्री गणेश मंदिर येथे समाप्त झाली. इंदिरा चौकात रॅली आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. शिक्षिका स्वाती गायकर म्हणाल्या, समाजजागृती हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. या रॅलीला सर्वांचे सहकार्य मिळाले.यानंतर रोटरी स्कूलच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी स्कूल फाँर डेफ डोंबिवली या शाळेतर्फ गेली ३४ वर्षे जागतिक कर्णबधिर दिन साजरा करत आहे. रॅलीचे घोषवाक्य`स्वच्छ भारत आणि काकलिअम इम्लांट`असे होते. तसेच स्वच्छता राखा, रोगराई टाळ, झाडे लावा, झाडे जगवा,पर्यावरण साधून स्वच्छ भारत बनवा अश्या प्रकारचे बॅनर घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले.या रॅलीत स्कूलचे चेअरमन रोटरियन ओमप्रकाश धुत,रोटरी क्लबचे अध्यक्ष सह रोटरी सदस्य महिला सदस्य स्वाती सिंगसह अनेक महिला त्याप्रमाणे मुख्यधिपिका अपेक्षा ठाकूर व शिक्षक सहभागी झाले होते.