मुंबई

पोलीस शिपाई रूपाली मेजारी यांच्या कर्तव्याला सलाम.. धावत्या लोकलमधून पडलेल्या गरोदर महिलेचे वाचवले प्राण

मुंबई : धावत्या लोकलमधून पडलेल्या 4 महिन्यांच्या गरोदर महिलेचे पोलीस शिपाई (बक्कल. नं.091925) रूपाली मेजारी यांनी प्राण वाचवले. ही धक्कादायक घटना 26 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10:30 ते 10:45 वाजण्याच्या दरम्यान फास्ट ट्रॅकवर घडली होती. गरोदर महिला सद्या वांद्र्यातील भाभा रुग्णालयात दाखल असून महिला व तिचा अर्भक सुखरूप आहे. रूपाली मेजारी यांच्या धडाकेबाज कामगिरीबद्दल गरोदर महिलेच्या पतीने त्यांचे आभार मानले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेटे यांनी कौतुक करून रूपाली मेजारी यांचा गौरव केला.
जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई रूपाली मेजारी या पश्चिम प्रादेशिक विभाग येथील कार्यालयात मीटिंगसाठी जात होत्या. जलद लोकलच्या महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पोशि रूपाली मेजारी या वांद्रे स्थानकात उतरण्यासाठी दरवाजापाशी येऊन उभ्या राहिल्या. स्थानक येण्यापूर्वी मोटरच्या जवळील महिलांच्या राखीव डब्याच्या दरवाजात उभी असलेली महिला चक्कर आल्याने धावत्या लोकलमधून पडल्याचे पोशि रूपाली मेजारी यांनी पाहिले. वांद्रे स्थानकात लोकल थांबताच पोशि रूपाली मेजारी या रेल्वे रुळावरून धावत जखमी महिलेजवळ गेल्या. त्या महिलेला स्थानकात आणून तात्काळ भाभा रुग्णालयात नेले. गंभीर जखमी महिलेच्या मोबाईलवरून तिच्या पतीशी संपर्क साधला असता तिचे नाव पूजा स्वप्नील जगताप (वय 23) असून ती 4 महिन्यांची गरोदर असल्याचे समजले.
वेळीस रुग्णालयात दाखल केल्याने पूजा आणि तिचे गर्भ वाचले, असे डॉक्टरांनी सांगितले.
पोलीस शिपाई रूपाली मेजारी यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे गरोदर महिला बचावली. या धडाकेबाज कर्तव्यासाठी पोलीस शिपाई रूपाली मेजारी यांना  सलाम!

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!