लातूर,दि.३०- किल्लारी गावात १९९३ च्या भूकंपातील मृतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी खासदार रवींद्र गायकवाड,खासदार सुनील गायकवाड,विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर,लातूर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत,भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.