मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरातील प्रार्थना समाज मार्गावरील दत्तात्रय नारायण शिरूर बालकाश्रमामधील विशाल उमेश गोरखे (वय 10 वर्षे), सनी रोहिदास पवार (वय 10 वर्षे), व्यंकटेश राजू ( वय 10 वर्षे) हे विद्यार्थी 29 सप्टेंबर 2018 रोज पहाटे 3:45 वाजता बेपत्ता झाली आहेत. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाणयात ( गु र क्र 326/18) भादंवि कलम 363 नुसार नोंद करण्यात आली आहे.
सदर बेपत्ता विद्यार्थी कोठे नजरेस पडल्यास तात्काळ मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्याशी 02226117317 या क्रमांकावर अथवा पोलिस निरीक्षक विलेपार्ले लक्ष्मण चव्हाण यांच्याशी 9869068578, पोलीस उपनिरीक्षक जयश्री नावलगी 8850391651 यांच्याशी या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
3 बेपत्ता विद्यार्थ्यांच्या शोधासाठी मदतीचे आवाहन!
