
डोंबिवली :- दि. ०१ ( प्रतिनिधी ) ठाणे जिल्हयाची पाण्याची तहान भागवणार्या बारवी धरणात यंदा देान वेळा पाणी ओव्हरफ्लो झाले होते.त्यामुळे यंदा तरी नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल असे वाटत होते मात्र आॅॅक्टोबर हिटचा तडाखा सुरु होताच कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे शिवाय औद्योगिक विभागातील उद्योजकही गेले काही दिवस पाणी टंचाईचा सामना करत आहेत आज डोंबिवली औद्योगिक विभागातील कार्यालयात काही नगरसेवक व उद्योजकांनीे धाव घेऊन पाणी टंचाईकडे लक्ष वेधले.
२७ गावात पाणी टंचाई सुरु झाल्याने रोज सुमारे ५० टॅॅकंरने पाणी पुरवठा करावा लागत आहे मात्र अचानक उद्योजकांनाही पाणी टंचाई जाणवू लागल्याने त्यानी डोंबिवली कार्यालय गाठले.पाणी नसल्याने उत्पन्नावर परिणाम होत असून तातडीने लक्ष देण्याची विंनती उद्योजकांनी अधिकार्याना केली.कल्याण डोंबिवली महापालिकेने २७ गावांसाठी १५-ते २० नवीन नळ जोडण्या दिल्या असल्याने जो भाग उंचावर आहे वा शेवटी आहे तेथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.शिवसेनेचे नांदिवली -सागावचे कार्यकर्ते सागर म्हात्रे यांनी सांगितले की २७ गावांना रोज सुमारे ९५ ते १०० टॅॅकंरने पाणी पुरवठा केला जातो पिंपळेश्वर येथील केंद्रातून सुमारे ४५ ते ५० तर रामचंद्र नगर टाकीतून सुमारे ४० ते ४५ टॅॅकर्स पाणी पुरवठा केला जातो जो भाग उंचावर आहे व नळजोडण्या जुन्या आहेत तेथे पाणी टंचाई जास्त असल्याचे नागरिक सांगतात..अनेक नागरिक बुस्टरने पाणी खेचून घेत असल्याने पाण्याची टंचाई वाढते असा आरोप काही महिलांनी केला.पाणी पुरवठयात सुधारणा केली नाही तर औद्योगिक विभाग कार्यालयात नवरात्री उत्सवात धरणे धरण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेचे जल अभियंता राजीव पाठक यांना विचारले असता ते म्हणाले शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता व काल पंपिंग बंद पडल्याने पाण्याचा दाब कमी झाला व यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून एक दोन दिवसात त्यात सुधारणा होईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.