डोंबिवली :- ( शंकर जाधव ) युग फॉउंडेशन संस्थेच्या वतीने डोंबीवलीत मोफत बौद्ध वधू-वर महामेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला. मंगल मैत्री मैरेज व्हाट्सअप फोरम ग्रुप ने बौद्ध समाजातील सुशिक्षित तरुण तरूणी, घटस्फोटीत,विधुर,अपंगा साठी मोफत वधू-वर महामेळाव्याचे आयोजन केले होते.महामेळावा डोंबिवली येथील पी.पी.चेंबर सभागृहात रविवार ३० रोजी सप्टेंबर रोजी सांयकाळी ४ ते ७ दरम्यान पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर, युग फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर , माजी नगरसेविका वनिताताई गोतपगार, अॅॅड .लिजीनार उपस्थित होते. या मेळाव्याच्या उद्देशाविषयी दयानंद किरतकर म्हणाले कि, कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असा कि, माणसाच्या आयुष्यातील जिथे दोन मने जुळतात तो महत्वाचा टर्निंग पाँईट व घटक म्हणजे विवाह.आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आणि नातेवाईकांना लग्न जुळविण्यास कमी वेळ मिळतो. अश्या कार्यक्रमातून ज्ञातीबांधवांचे व धम्मबांधवांचा परिचय व सुसंवाद साधला जातो.अश्या कार्यक्रमातून एक प्रकारे पुण्य मिळते. या कार्यक्रमासाठी राज्यातून मोठ्या संख्येने तरुण – तरुणी आले होते.या वधू- वर मेळाव्यातून जे तरुण भावी आयुष्याची सुरुवात करतील त्यांना शुभेच्छा देत आहोत.तर, फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर म्हणाल्या की, अश्या कार्यक्रमातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळते.विवाह म्हणजे प्रेमाचे बंधन असते, घराचे घरपण असते, विधात्याचे साकार करण्याचे स्वप्न असते.अश्या कार्यक्रमातून समाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचा आनंद आम्हास होत आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित पवार यांनी केले.पराग वाघमारे, मंदार वाघमारे, हेमंत पांगम, सुनिल चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.