डोंबिवली :-दि,०२ ( शंकर जाधव ) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भाजपने डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी उद्यानात महात्मा गांधीच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यासह भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने झाले होते. भारत माता कि जय, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम असे म्हणत निघालेली पदयात्रा डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी उद्यानापासून महात्मा गांधी रोड, सुभाष रोड, महात्मा फुले रोड गुप्ते रोड आणि पंडित दीनदयाळ रोडवरून सम्राट हॉटेलच्या चौकातील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात समाप्त झाली.
भाजपच्या वतीने डोंबिवलीत निघाली स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा …
October 2, 2018
37 Views
1 Min Read

-
Share This!