ठाणे

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारच्या विरोधात केली मूक धरणे आंदोलन


ठाणे (प्रतिनिधी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष सुरु झाले आहे. मात्र या वर्षातच भाजप सरकारकडून गांधीजींच्या सत्य , अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फसला जात आहे. या देशात सध्या अराजकता माजली आहे. सदृढ लोकशाहीचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते. मात्र भाजपचे सरकार या देशात अप्रत्यक्ष हुकूमशाही लादत आहे. महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजप सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, प्रदेश चिटणीस तथा नगरसेवक सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मूक धरणे आंदोलन करण्यात आले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते धरणे आंदोलनास बसले. या कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडाला काळ्या फिती लावल्या होत्या. तसेच राफेल करारामध्ये झालेला भ्रष्टाचार ; एच ए एल कंपनीला राफेल बनवण्याची क्षमता नाही या असत्याची मांडणी, सनातन या संस्थेवर बंदी न घालून हिंसेला संधी देणे , देशातील संविधानाचे दहन करणार्यांना अभय देऊन अशांती निर्माण करणे आदींच्या माध्यमातून म . गांधींच्या सत्य -अहिंसा आणि शांतता या तत्वांना हरताळ फसला जात आहे. असे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच ५६ इंचाची छाती असल्याचे सांगून सत्ता मिळवलेल्यानी शेतकरी, कामगार, कष्टकरी , दलित , आदिवासी , मुस्लिम, धनगर आदींच्या विरोधात मोहीम राबवली असल्याका आरोप करून गांधी जयंतीच्या पार्शवभूमीवर या सरकारचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनात या आंदोलनामध्ये महेश साळवी, मोरेश्वर किणे, नगरसेविका वर्षा मोरे, माजी उप-महापौर शरद कोळी, माजी महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, माजी शिक्षण मंडळ सदस्य हेमंत वाणी, कोपरी पांचपाखाडी विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, कोपरी पांचपाखाडी विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, संतोष तिवारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. वंदना जाधव, अजित सावंत, दिपक क्षत्रिय, तुळशीराम म्हात्रे, दिलीप नाईक, मयुर सारंग, अरविंद मोरे, महेंद्र पवार, इब्राहिम राऊत, संतोष दगडे, विजय पवार, समाधान माने, दिलीपराव मोहिते, ब्लॉक अध्यक्ष निलेश कदम, रविंद्र पालव, निलेश फडतरे, समीर भोईर, दत्तात्रय जाधव, रत्नेश दुबे, वॉर्ड अध्यक्ष सुमित गुप्ता, सुरेश सिंग, शिवा कालुसिंह, प्रदिप झाला, महिला पदाधिकारी मेहरबानो पटेल, माधुरीताई सोनार, शशिकला पुजारी, ज्योती निंबर्गी, स्मिता पारकर, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, युवक प्रदेश सचिव हैदर शेख, युवक सरचिटणीस सचिन पंधारे, युवक ब्लॉक अध्यक्ष दिपक पाटील, रोहित भंडारी, संदिप पवार, संतोष मोरे, युवक सचिव जावेद शेख, विद्यार्थी अध्यक्ष अभिजीत पवार, विद्यार्थी प्रवक्ता प्रफुल कांबळे, उपाध्यक्ष संकेत नारणे, विद्यार्थी पदाधिकारी अनिकेत शेवाळे, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, ओबीसी सेल अध्यक्ष राज राजापूरकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, रविंद्र सावंत, सेवादल प्रदेश प्रतिनिधी तसबीर सिंग, सेवादल अध्यक्ष बाळकृष्ण कामत, अल्पसंख्यांक सेल कार्याध्यक्ष हुसेन मणियार, हिंदी भाषिक सेल अध्यक्ष प्रभाकर सिंग, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष रामदास खोसे आणि बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!