महाराष्ट्र

भावली धरणक्षेत्रात स्वच्छता अभियान

नाशिकः इगतपुरी तालुक्यातील भावली धरण क्षेत्रात मंगळवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. प्लास्टिक कचर्‍याबरोबरच मोठ्या प्रमाणात मद्याच्या फुटलेल्या बाटल्या आढळून आल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, इगतपुरी सिटीझन फोरम, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यंकटेशनगर, वनविभाग आणि पंचवटी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी स्वच्छता अभियान राबविणात आले.
भावली धरणाजवळील गायवझरा व सुपवझरा या धबधब्यांलगतच्या परिसरात सुमारे एक ट्रॅक्टर ट्रॉली एवढा प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटताना पर्यावरणाला हानी पोहोचेल अशी कृती पर्यटकांनी करु नये असे आवाहन एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश बागूल, नितीन नागपुरे, डी.टी.मोकळ, विनायक पाटील, संजय खेताळे, बी.जी.राव, अविनाश गोठी, आर.जे.परदेशी आदींनी परीश्रम घेतले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!