क्रिडा

गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ; तायक्वांदो साठी ओंबासे सहाय्यक स्पर्धाप्रमुख

कल्याण :- गोवा येते 30 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान होणाऱ्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (NATIONAL GAMES) या स्पर्धेसाठी सहाय्यक स्पर्धाप्रमुखपदी तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया चे सहसचिव संदीप यशवंतराव ओंबासे (कल्याण) यांची भारतीय तायक्वांदो महासचिव श्री प्रभात कुमारशर्मा यांनी नुकतीच नियुक्ती केली. गोवा येथे होणाऱ्या या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो स्पर्धाप्रमुख म्हणून अच्युत रेड्डी (आंध्र प्रदेश) हे काम पाहणार असून त्यांना सहायक स्पर्धा प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे श्री संदीप ओंबासे यांची नियुक्ती केली आहे.

36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा येते होणार असून स्पर्धा पूर्व तयारी म्हणून भारतीय सर्व खेळाचे प्रमुख यांची 5 ऑक्टोंबर रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम गोवा येते मीटिंग संपन्न होणार आहे. या मीटिंगसाठी तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने श्री अच्युत रेड्डी व संदीप ओंबासे हे दोघे या उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रला खूप वर्षानंतर तायक्वांदो खेळासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रला खूप मोठी संधी मिळणार आहे. आणि या खेळासाठी सहाय्यक स्पर्धा प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे संदीप ओंबासे हे काम पाहणार आहेत. नुकतेच तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने संदीप ओंबासे यांची राष्ट्रीय संघटने वर सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच आता 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ते असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहणार आहेत.

संदीप ओंबासे हे गेली 26 वर्षे तायक्वांदो चा महाराष्ट्र मध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सदस्य, सहसचिव आणि काही वर्ष सचिव म्हणून त्यांनी यशस्वीरित्या काम पाहिले असून महाराष्ट्र मध्ये तायक्वांदो वाढीसाठी तसेच तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्पर्धा, राज्य स्पर्धा आयोजनामध्ये यांचा मोठा सहभाग असतो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची झालेली नियुक्ती म्हणजे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची सर्वात मोठी त्यांना मिळालेली पोचपावती आहे असे म्हणावे लागेल.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!