सोलापूर ( प्रकाश भगेकर) – नवरात्र महोत्सवाचे अनुषंगाने मंडळाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांची बैठक आज पोलिस आयुक्तालयात पार पडले.
यावेळी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले आहे.
गणेशोत्सव काळात चांगल्या पद्धतीने पोलिस संरक्षण देऊन शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचा सत्कार करण्यात आला.