महाराष्ट्र

सोलापूरच्या टेक्सटाईल उद्योगवाढीसाठी कायम सहकार्य : सहकारमंत्री सुभाष देशमुख

*व्हायब्रन्ट टेरी टॉवेल या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे लॉंचिंग*

सोलापूर (प्रकाश भगेकर):  – टेक्सटाईल डेवलोपमेंट फौंडेशनच्या पुढाकाराने सोलापुरात पुढील वर्षी गुजरातच्या धरतीवर आंतरराष्ट्रीय व्हायब्रन्ट टेरी टॉवेल हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे लोगो अनावरण आणि वेबसाईटचे उदघाटन आज गुरुवारी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, मार्केटिंग सल्लागार जगत शहा, टीडीएफचे अध्यक्ष राजेंद्र गोसकी, श्रीनिवास बुरा, व्हायब्रन्ट टेरी टॉवेल प्रदर्शनाचे अध्यक्ष सिद्धेश्वर गडडम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गडडम, माजी खासदार धर्मण्णा सादुल यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मार्केटिंग सल्लागार जगत शहा यांनी या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रदर्शनामुळे सोलापूरच्या टेक्सटाईल उद्योगाला जागतिक बाजारपेठेत एंट्री मिळणार असून, जास्तीत जास्त यंत्रमागधरकांनी या प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केलं. वर्षभरात विविध देशात रोड शोद्वारे सोलापूरच्या टॉवेलचे प्रमोशन करण्यात येणार असल्याचे जगत शहा यांनी सांगितले.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मी अनेक दिवसांपासून सोलापूरचे मार्केटिंग करण्याच सांगत होतो,सोलापूरात रोजगार वाढवा यासाठी सातत्याने प्रयत्न केलं. काही नसताना लोकमंगलचे ब्रॅण्ड बनविला, टेक्सटाईल उद्योगवाढीसाठी कायम सहकार्याची भावना राहील ,सोलापूरच्या चादर आणि टॉवेलची ब्रँडिंग करायचं होतं.आता टीडीएफने सुरू केलेल्या प्रयत्नाने नक्की हे यश मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.जग बदलत चाललेलं आहे स्पर्धेत टीकायचं असेल तर कमी दरात दर्जेदार उत्पादन करावे असा सल्लाही सहकारमंत्र्यांनी यावेळी उद्योजकांना दिला.

जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना सोलापुरात मेगा क्लस्टरला मंजुरी मिळाली असून, सर्वा उद्योजकांनी यासाठी सहकार्य केल्यास लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल असं ते म्हणाले.
दरम्यान या आंतरराष्ट्रीय व्हायब्रन्ट टेरी टॉवेल प्रदर्शनाला सोलापूरच्या टेक्सटाईल उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी २० कारखानदारांनी स्टॉल बुकिंग केलं असून, या प्रदर्शनात १०० स्टॉल राहणार असून परदेशातील खरेदीदारांसह देशातील २० राज्यातील १००० कंपन्या सहभागी होणार आहे. या लोगो लॉंचिंग कार्यक्रमास उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!