महाराष्ट्र

सोलापुरातील वर्दळीच्या शिंदे चौकातली अतिक्रमणे हटविली

सोलापूर (प्रकाश भगेकर )महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने आज (रविवारी) सकाळी नवी पेठ परिसरातल्या शिंदे चौक येथे अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली. त्यावेळी हातावर पोट असणाऱ्या टपरी, हातगाडे धारकांनी ही अतिक्रमणे हटविण्यासाठी अतिक्रमण पथकाला विरोध केला. खासकरुन महिलांनी केलेला आक्रोश पाहून महानगरपालिकेचे अधिकारी भालेराव या ठिकाणाहून निघून गेले. मात्र, ही अतिक्रमण विरोधी मोहीम सुरुच राहिली.

शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमण विरोधी आज कारवाई करण्यात आली. यावेळी मोक्याच्या ठिकाणची अतिक्रमण हटविण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाची संलग्नित पोलीस आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविली.
अतिक्रमण विभागाच्या पथकाने सुरू केलेल्या या मोहिमेला स्थानिक नेत्यांनी अतिक्रमण हटविण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज रविवार असल्याने या पथकाला रोखण्यासाठी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याने ही मोहीम जोमाने पार पडली आणि ते शिंदे चौकाने मोकळा श्वास घेतला. तर दुसरीकडे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करणाऱ्या,फूटपाथ नजीकच्या घरांचे नुकसान झाले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!