
अंबरनाथ दि. ०८ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
ठाणे येथे झालेल्या “येऊर हिल्स मॅरेथॉन २०१८” स्पर्धेमध्ये अंबरनाथ येथील श्री बालाजी हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर नितीन जोशी यांनी १० किलोमीटर स्पर्धेत “प्रथम क्रमांक” पटकावला आहे. “रन फॉर ग्रीन ठाणे” ही संकल्पना घेऊन ठाणे येथे “येऊर हिल्स मॅरेथॉन २०१८” चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात अंबरनाथ येथील श्री बालाजी हॉस्पिटलचे डॉ. नितीन जोशी यांनीही सहभाग नोंदविला होता. डॉ. जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्याने त्यांना प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जोशी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
काही वर्षांपूर्वी डॉ. नितीन जोशी यांनी उल्हासनगर येथील श्री. दुर्गाप्रसाद यादव (३५) या व्यक्तीच्या किडनीत एक दोन नव्हेतर तब्बल बाराशे स्टोन (खडे) झाले होते. ते डॉ. नितीन जोशी यांनी यादव यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून श्री बालाजी हॉस्पिटल येथे ऑपरेशन केले होते. त्यावेळेसही जोशी यांचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. डॉ. नितीन यांचे बंधू डॉ. अशोक जोशी हे देखील अंबरनाथमधील प्रसिद्ध डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. तर नितीन जोशी यांचे वडील ऍड. यशवंत जोशी हे देखील अंबरनाथ नगरपालिकेतून ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते व सद्या ते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत.