कोकण(एस.एल.गुडेकर) काँग्रेसचे जेष्ट नेते तथा दिवंगत लोकप्रिय कामगार नेते श्याम पदाजी म्हात्रे यांची जयंती तसेच जयंती निम्मित आयोजित करण्यात आलेले संविधान जनजागृती व कामगार मेळावा पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात दि.७ आँक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने व कामगारांच्या भरघोस प्रतिसादाने संपन्न झाला.स्वर्गीय श्याम पदाजी म्हात्रे यांच्या जयंती निमित्त कामगार मेळावा प्रसंगी माजी आमदार विवेकानंद पाटिल, आ. बाळासाहेब पाटिल, उद्योजक जे एम म्हात्रे, प्रमोद भगत(नगरसेवक पनवेल),कविताताई चौतमल(महापौर पनवेल महानगर पालिका)विक्रांत पाटिल(उपमहापौर पनवेल),प्रीतम म्हात्रे(विरोधी पक्षनेते(पनवेल महानगर पालिका),डॉ. भक्तिकुमार दवे(जेष्ट काँग्रेस नेते),आर सी घरत(रायगड जिल्हाध्यक्ष काँग्रेस), महेंद्र घरत(कामगार नेते),श्रद्धा ठाकुर(रायगड जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस),जे डी जोशी(उरण तालुका अध्यक्ष काँग्रेस),कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल चे रविशेठ पाटिल, उरण उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटिल, निर्भिड लेख चे संपादक कांतीलाल कडु, साप्ताहिक वार्तादीप चे संपादक राजेंद्र घरत, गजानन थले(सरचिटणीस कोकण श्रमिक संघ),यतिन देशमुख(मनसे पनवेल शहर अध्यक्ष),संज्योत वढावकर(कामगार तज्ञ),संध्या ठाकुर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम संभाजी भगत यांच्या संविधान जनजागृती कार्यक्रम मधून प्रथम करु वंदन माणसाला या गीताने सुरवात झाली. त्यानंतर संविधान वंदन करण्यात आले. संविधान जनजागृती कार्यक्रमातुन देशाची सद्यस्थिती, देशातील विविध समस्या, वाईट चालिरीति यावर घणाघाती तसेच विनोदी शैलीने संभाजी भगत व त्यांचे साथीदार बाबासाहेब अटकले यांनी प्रहार केला.प्रास्तविक श्रुती म्हात्रे यांनी केले असून प्रस्तावनेत नेहमी असाच भरभरुन प्रतिसाद सर्वांनी द्यावा असे आवाहन करत कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी स्पष्ट केली.
एकता कॅटलिस्ट व कोकण श्रमिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना ९ कॅटलिस्ट रत्न -२०१८ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दीपक घरत- पत्रकार,कॉ. भूषण पाटिल(कामगार क्षेत्र),जयवंत पाटिल(शैक्षणिक क्षेत्र),विवेक केणी(पर्यावरण),तुळसीराम पवार(कामगार क्षेत्र),युवराज बैसाणे(महिला चळवळ),डॉ. सतीश विसपुते(वैद्यकीय क्षेत्र),संजीव सईद(निर्माल्य व्यवस्थापन),विलास घाग(कृषी क्षेत्र), या ९ व्यक्तींना ९ कॅटलिस्ट रत्न -२०१८ या पुरस्काराने गौरविन्यात आले. तर आ. प्रशांत ठाकुर अध्यक्ष सिडको, बाळासाहेब पाटिल अध्यक्ष कोकण म्हाडा, आ. कपिल पाटिल, कविता चौतमल महापौर पनवेल,विक्रांत पाटिल उपमहापौर पनवेल, प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेता पनवेल महानगर पालिका या ६ व्यक्तींना विशेष कॅटलिस्ट पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे सर्व मान्यवरांचे पर्यावरण पद्धतीने वही, तुळसीचे रोप देउन स्वागत करण्यात आले.
कामगार मेळाव्या प्रसंगी हिंद मजदूर सभा ठाणे जिल्हाध्यक्ष संज्योत वढावकर यांनी विविध कामगार कायदे यांची तोंड ओळख उपस्थित कामगारांना करून दिली. आज भारतात १००% पैकी फक्त ६ % लोक संघटित क्षेत्रात काम करतात उर्वरित ९४ टक्के लोक असंघटीत क्षेत्रात काम करतात याचा अर्थ ९४ % लोक असुरक्षित आहेत. त्यांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आहे. आज कामगारांना वेठबिगारी सारखे अपमानास्पद जीवन जगावे लागत आहे.ना वेळेवर पगार मिळतो, ना सुट्टी मिळते, शिवाय १२ ते १४ तास काम करावे लागते, बोनस नाही,कमी पगार, वरिष्ठ अधिकारी यांची मनमानी, सामाजिक सुरक्षितता नाही, पेंशन नाही, कधिही कामावरुन काढून टाकनार,आवश्यक त्या सेवा सुविधा नाही, महिला पुरुष असा कामाच्या ठिकाणी चाललेला भेदभाव सर्वत्र प्रचंड प्रमाणात पहावयास मिळत आहे. याला कारणीभूत सरकारची धोरणे असून ही सरकार ची धोरणे कामगार विरोधी आहेत. त्यांना कामगारांचा विकास नको.कामगार विरोधी धोरणांना वेळीच विरोध केला पाहिजे स्वतः च्या न्याय हक्कासाठी कामगार वर्गवार, सभा आंदोलने करण्याची वेळ आली आहे. एकीकडे देशाचा विकास दर ७ टक्के वर गेला आहे,देशाचा विकास झपाट्याने होत आहे असे सांगण्यात येते.मात्र दुसरीकडे कामगारांची अशी दयनीय अवस्था बघून हे विकास दर, विकास सत्य आहे असे वाटत नाही.४४ कायदे हे कामगार क्षेत्राशी संबंधित असून कामगार हीताचे सर्व कायदे बरखास्त होण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकार व राज्यसरकार हे कामगार विरोधी धोरण घेत आहे. त्यामुळे भविष्यात कामगारांचे भविष्य आणि अस्तित्व धोक्यात येणार आहे. अश्या कामगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत संज्योत वढावकर यांनी या प्रसंगी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यतिन देशमुख तर आभार प्रदर्शन गजानन थले यांनी केले.
“वैचारिक वारसा पुढे नेन्याचे काम दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या कन्या श्रुती म्हात्रे करत आहेत. राजकीय वारसा असलेल्या श्रुती म्हात्रे यांच्या पाठीशी नेहमी शेतकरी कामगार पक्ष खंबिरपणे उभे राहिल, श्याम म्हात्रे आज आपल्यात नसले तरि त्यांच्या कन्याच्या रुपात श्याम म्हात्रे साहेब यांचे कार्य व विचार जीवंत राहतील. जयंती निमित्त म्हात्रे साहेब यांना आदरांजली वाहुन श्रुती म्हात्रे यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देतो.
– आ. विवेकानंद पाटिल.
———–
श्रुती म्हात्रे या उच्चशिक्षित असून कामगार क्षेत्रातील उत्तमजाण त्यांना आहे. JNPT मध्ये श्याम म्हात्रे साहेब यांनी sez तसेच प्रकल्पग्रस्त,शेतकरी यांचे विषय हाताळुन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आज श्याम म्हात्रे यांच्या नंतर त्यांची जबाबदारी श्रुती म्हात्रे यांच्यावर आली आहे. मला खात्री आहे की ही जबाबदारी त्या उत्तमपणे पार पाडतील.
– कामगार नेते महेंद्र घरत.
—————
श्याम म्हात्रे प्रसिद्ध कामगार नेते होते. त्यांनी कामगार, दिन दलित यांना न्याय मिळवून दिला. त्यांचे अपूर्ण स्वप्न श्रुती म्हात्रे पूर्ण करनार आहे.श्रुती म्हात्रे हीने कामगार संबंधी काही समस्या चांगल्या पद्धतीने हाताळल्या आहेत. कामगार क्षेत्रात ती आज वडिलांचा आज वारसा चालवत आहे. कामगार क्षेत्रात श्रुती मुळे कामगार वर्ग यांना नक्कीच न्याय मिळेल. वडिल प्रमाणेच श्रुती म्हात्रे जनतेचा विश्वास संपादन करेल.
सौ. संज्योत वढावकर
कामगार चळवळीचे अभ्यासक तथा अध्यक्ष ठाणे जिल्हा, हिंद मजदूर सभा.
—————–
श्रुती म्हात्रे या माझ्या मैत्रीण आहेत. त्या एक चांगल्या चळवळीतील कार्यकर्त्यां आहेत. कमी वयात त्या चांगली कामगिरी करत आहेत.त्या कामगार वर्गाच्या पाठीशी ठामपने उभ्या आहेत. सर्वांनी त्यांना सहकार्य करावे.श्रुती हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
– कविता चौतमल
महापौर, पनवेल महानगर पालिका, पनवेल.