कल्याण : कराटे आणि शिकाई मार्शल आर्ट या स्पर्धेला आज सद्गुरु वामनराव पै या इंदोर मैदानामध्ये नगरसेवक संजय हरिभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते व अध्यक्ष खाली सुरुवात करण्यात आली या स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील काल आणि आज मिळून शिकाई मार्शल आर्ट, कराटे आणि वुशु या तिन्ही स्पर्धेमध्ये जवळजवळ 650 खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील जवळजवळ चाळीस ते पन्नास क्रीडा शिक्षक दोन्ही दिवस उपस्थित राहून स्पर्धेला सर्वतोपरी सहकार्य व मदत कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचे नगरसेवक संजय पाटील यांनी विशेष आभार मानले. आणि स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. या तिन्ही स्पर्धेतील विजेते खेळाडू विभागीय स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची प्रतिनिधित्व करणार आहे.
कराटे आणि शिकाई मार्शल आर्ट या स्पर्धेला आजपासून सुरूवात
