ठाणे मनोरंजन

खा. डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित सर्वात मोठा दांडिया डोंबिवली रासरंग २०१८’ फेस्टिवल… स्वमग्न मुलेही खेळणार दांडिया !

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ‘डोंबिवली रासरंग २०१८ आठ दिवस डोंबिवली पूर्व येथील डी.एन.सी. शाळेच्या प्रांगणात डोंबिवलीतील सर्वात मोठा दांडिया फेस्टिवल रंगणार आहे. या फेस्टिवलमध्ये तब्बल १ लाखाहून अधिक लोक दांडियाच्या जल्लोषात सहभागी झाले होते यंदा देखील दांडिया फेम मनीषा सावला यांची धम्माल गाणी आणि बिपिनचंद्र चुनावाला यांच्यासह पार्थ गांधी,सिद्धेश जाधव, वाचा बिपिन आदींच्या गाण्यांच्या तालावर नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहपूर्ण वातावरणात डोंबिवलीकर थिरकणार असून हिंदी, मराठी, गुजराती मालिका चित्रपटांतील सुप्रसिद्ध कलाकार ‘डोंबिवली रासरंग २०१८’ कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यात स्त्रियांसाठी मराठमोळ्या संस्कृतीने बहरलेला भोंडला हा खेळ खेळला जाणार असून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीतील कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमाला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, महिला संघटक कविता गावंड, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, भाऊसाहेब चौधरी, किरण मोंडकर आदींचे सहकार्य लाभले आहे. प्रत्येक दिवशी उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना विशेष पारितोषिकेही देण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले. डोंबिवलीकरांची रसिकता आणि इथल्या तरुणाईची सळसळती उर्जा गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही ‘रासरंग’उपक्रमाला यशस्वी करेल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. हा दांडिया महोत्सव हा डोंबिवलीकरांचा आपला महोत्सव असून डोंबिवलीकर नागरिकांनी आणि तरुणाईने यात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही खा. डॉ. शिंदे यांनी केले. या दांडियात संतोष इन्स्टिट्यूट गतिमंत मुलांची शाळेतील सुमारे ६० स्वमग्न मुले खेळणार असल्याचे संस्थेच्या कांचन पवार यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!