डोंबिवली :- ( शंकर जाधव ) पालिका प्रशासन अव्वाच्या सव्वा कर वसूल करत असली तरी त्या मोबदल्यात नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने जागरूक नागरिक संघटनच्या वतीने चार दिवसा पूर्वी कल्याण पश्चिम व पूर्व येथे आमरण उपोषण छेडल सुरु केले होते .अखेर आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी रात्री उपोषण स्थळी जावून उपोषण कर्त्यांची भेट घेत त्यांना नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्या साठी पुढाकार घेतला असुन स्वतः त्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
पालीका नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा वारेमाप मालमत्ता कर वसूल करीत असली तरी त्या मोबदल्यात नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने जागरूक नागरिक संघटना गेल्या वर्षभरापासून पालिका प्रशासना विरोधात विविध आंदोलनच्या माध्यमातून संघर्ष करत आहे. अनेकदा पालिका प्रशासनाकडून आश्वासने मिळाली मात्र प्रत्यक्षात अमलबजावणी झाली नसल्याने अखेर संघटनेने ५ ऑक्टोबर रोजी कल्याण पश्चिम व पूर्व येथे आमरण उपोषण सुरु केल होते. तिसऱ्या दिवशी पालिका प्रशासनाने बैठक घेण्याचे सांगितले. मात्र उपोषणकर्त्यांनी आम्हला चर्चा नको कृती हवी असे स्पष्ट करत जोपर्यंत प्रत्यक्षात अमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असा निर्धार व्यक्त केला होता काल उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने नागरिकांमधून जनमानसात संताप व्यक्त करण्यात येत होता अखेर काल रात्री हे उपोषण मागे घेण्यात आले .याबबत श्रीनिवास घाणेकर यांनी गेल्या ४ दिवसांपासुन सुरु असलेले बेमुदत आमरण उपोषण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण ह्यांच्या मध्यस्तीने मागे घेण्यात आले. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयुक्त दालनात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे . रवींद्र चव्हाण ह्यांनी नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्या साठी पुढाकार घेतला असुन स्वतः त्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने त्यांच्या ह्या आश्वासनाचा मान ठेवुन व विश्वास ठेवुन आपले आमरण उपोषण मागे घेतल्याचे संगीतले.