मुंबई : गुजरातमधून पळालेल्या कैद्याला मुंबईत अटक करण्यात आली आहे. या कैद्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगत असताना पोटदुखीचे ढोंग करून या कैद्याने 19 एप्रिल 2018 रोजी गुजरातमधील नारणपुरा पोलिसांना फूस लावून पळ काढला होता.
गुजरातमधील नारणपुरा पोलिसांनी रेकॉरिडवरील सिराज खान मसकूर खान पठाण ऊर्फ उडता कबुतर याला 2008 साली अपहरण व जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या गुन्ह्याप्रकरणी त्याला 2015 साली आजीवन कारावास व 3 लाख 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा गुजरातच्या स्थानिक न्यायालयाने सुनालली. साबरमती कारागृहात शिक्षा भोगत असताना सिराज पठाणने पोटदुखीचे साेंग केले. त्यामुळे 19 एप्रिल 2018 रोजी पोलिसांचे पथक सिराज पठाणला उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात घेऊन निघाले. पोलिसांना फूस लावून सिराज पठाणने पळ काढला. या प्रकरणी शहीबाग पोलिसांनी सिरज पठाणविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा गुजरात पोलीस शोध घेत होते.
दरम्यान, मुंबईत पळून आलेला सिराज पठाण अंधेरीतील वेस्टर्न व्हायवे मेट्रो जंक्शन येथे येणार असल्याची माहिती मुंबऊ गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 3 च्या पथकाला मिळाली. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 7 ऑक्टोबर 2018 रोजी सापळा लावून सिरजा पठाणच्या मुसक्या आवळल्या.
सिरजाच्या अटकेसाठी गुन्हे प्रकटीकरणचे (मध्य) सहाय्यक पोलीस आयुक्त नेतैजी भोपळे, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 3 चे पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उघडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश साळवी, रमेश गावीत, हवालदार (चालक) अरविंद करंजे, पोलीस नाईक प्रमोद सकपाळ, पोलीस शिपाई दीपक कोळी, मंगेश शिंदे, भास्कर गायकवाड आदी पोलीस उत्तम कामगिरी बजावली.