डोंबिवली :- दि. १० ( प्रतिनिधी ) पावसाने उसंत घेताच कल्याण डोंबिवली परिसरात साथ रोग्याच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील ४ महिन्यात शहरात २२ हजार ८७० तापरुग्णाची नोंद झाली असून लेप्टो, डेंग्यू, गेस्ट्रो, टायफाईडच्या रुग्णाची नोंद झाली आहे.
कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात १ जून ते ७ ऑक्टोबर पर्यत डेंग्यू – ८९०,ताप रुग्ण २२८७०,गस्ट्रो २३२,कावीळ २१८,टायफाईड ५२७,लेप्टो संशयित ११,मलेरिया १९८,स्वाइन फ्ल्यू ७ अशी नोंद आहे तर लेप्टोने मागील ४ महिन्यात ४ बळी घेतले असून डेंग्यूच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. खाजगी आणि सरकारी रूग्णालयात ताप आणि व्हायरल फिव्हर साठी दाखल होणार्या रुग्णाची संख्या वाढत असल्याचे पालिकेतील रुग्णालयाच्या आकडेवारीवरून उघड होत आहे. साठलेल्या पाण्यावर वाढणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियाचे डास, कचर्यामुळे वाढणार्या उंदीर घुशी या प्राण्यामुळे पसरणारा लेप्टो, टायफाईड, दुषित पाण्यामुळे होणारी कावीळ यासह तापमानात अचानक वाढ झाल्याने ताप जन्य आजारात वाढ झाली असून पालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रूग्णाच्या लांबच लांब रांगा दररोज लागतात. साथींच्या आजारांचा फैलाव वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी जावून सर्वेक्षण सुरु केले आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने स्वच्छ्ता अभियान अधिक व्यापक राबवन्यास सुरुवात केली आहे. दरम्यान साथीच्या आजाराची आकडेवारी वाढत असून नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि परिसरात डासाची पैदास होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
हातगाड्यांंवर कारवाई नाहीच
साथीच्या रोगाचा शहराला विळखा पडला असतानाच साथीच्या रोगांना निमंत्रण ठरणारर्या रस्त्या रस्त्यावर सुरु असलेल्या हातगाड्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही मात्र नागरिकांनी वांरवार पाठपुरावा केल्यानंतरही आरोग्य विभागाला हात्गाद्याचा विसर पडला असून शहरात या हातगाड्या मोकाटपणे व्यवसाय करत आहेत.