ठाणे

दिवा रेल्वे स्थानकात  रुग्णावाहिका  नसल्याने टेम्पोतून आणला मृतदेह …  

दिवा : ( शंकर जाधव  ) दिवसाला दररोज किमान दीड ते दोन लाख प्रवाशी आणि दर महिन्याला ४ कोटी रुपये उत्पन्न रेल्वे प्रशासनाला मिळते.  सुविधा देण्याबाबत मात्र रेल्वे प्रशासनाने दिवा रेल्वे स्थानकाकडे पाठ दाखविल्याचे दिसते. दिवा रेल्वे स्थानकात  रुग्णावाहिका नसल्याने मृतदेह टेंम्पोतून नेण्याची वेळ नातेवाईकांवर आल्याने रेल्वे प्रशासनावर प्रवासी वर्ग आणि दिवावासी नाराज झाले आहेत.वास्तविक प्रत्येक रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका असणे गरजेचे असताना याकडे का लक्ष दिले नाही असा प्रश्न प्रवाश्यांकडून विचारला जात आहे. आगासन गेटजवळ एका अपघातात प्रवाशी मृत्यूमुखी पडल्याने त्याचा मृतदेह रुग्णवाहिका नसल्याने   टेंम्पोतून दिवा स्थानकात आणावा लागला. दिव्यात कोणतीही अॅंब्युलन्स लवकर मिळत नसल्याने जखमींना गोल्डन अवर उपचार मिळत नाहीत.
      दिवसाला दररोज किमान दीड ते दोन लाख प्रवाशी प्रवास करत असले तरी तेथे सुविधांची वानवाच आहे. दिवा स्टेशन परिसरात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण ही दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी दातिवली स्टेशनजवळील आगासन गेटहून आत एक किलोमीटर अंतरावरील रेल्वे रुळावर एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा फोन जीआरपी हेड विश्वास जाधव यांना आला. त्यांनी तो मृतदेह उचलून आगासन गेटजवळ आणला. पण त्यावेळी रुग्णावाहिका  उपलब्ध नसल्याने तेथून जाणाऱ्या एका टॅंम्पो चालकाला विनंती करुन तो मृतदेह टॅंम्पोतून दिवा स्थानकात आणण्यात आला. त्यानंतर  रेल्वेने ठाणे सिविल हॉस्पिटला पाठवून दिला. दिवा स्टेशनची मध्य रेल्वे लाईनची हद्द मुंब्रा नदीपासून सुरु होऊन ती थेट कोपर स्टेशनपर्यंत तर पनवेल लाईन ची हद्द थेट कंळबोली पर्यंत आहे. तसेच दिवा स्थानकातून दिवा – रोहा, दिवा – वसई, दिवा – कर्जत- कसारा आणि टिटवाळा अशा तीनही लाईनवर प्रवाशी प्रवास करत असतात. या कोणत्याही लाईनवर अपघातातील जखमी प्रवाशाला दिव्यात आणताना जिकरीचे होते. त्यात रुग्णवाहिका नसल्याने त्या जखमी प्रवाशावर उपचार करेपर्यंत त्याचा मृत्यू ओढवलेला असतो. दिव्यात तिन्ही मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु असतानाही या स्टेशनवर एकही अॅंब्युलन्स नसणे हे प्रवाशांसाठी घातक आहे. दिवा स्थानकात होणाऱ्या अपघातातील जखमींना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास त्यांचा उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो. दिव्यातील जखमींसाठी डोंबिवली वा मुंब्रावरुन रुग्णवाहिका मागवली जाते. तेथून येणारी रुग्णवाहिका  रुग्णाला घेऊन हॉस्पिटलपर्यंत जाई पर्यंत त्याचे बील दीड ते दोन हजार होते. पण रेल्वे कडून फक्त साडे सातशे रुपये दिले गेल्याने कोणती रुग्णवाहिका दिवा स्टेशनवरील जखमींना नेण्यास तयार नसते रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर  माहिती दिली.
  सहा महिन्यात  ९८ रेल्वे अपघातात मृत्युमुखी … 
दिवा रेल्वे  स्थानकादरम्यान  एप्रिल महिन्यात १७,मे महिन्यात ०७, जून महिन्यात १७ , जुलै महिन्यात १८ , ऑगस्ट महिन्यात २२ आणि सप्टेंबर महिन्यात १७ असे एकूण  ९८  जणांचा  रेल्वे अपघात मृत्यू झाला आहे.. दिव्यात एकही सरकारी हॉस्पिटल वा मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल उपलब्ध नसल्याने अपघातातील जखमींना ठाण्याच्या हॉस्पिटल नेण्यासाठी रेल्वेचाच आधार घ्यावा लागतो. त्या जखमींना वा मृतदेहाला रेल्वेच्या सामान बोगीत टाकून ठाणा स्टेशनला आणले जाते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!