
डोंबिवली : -दि. १२ ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील वै. ह.भ.प.सावळाराम महाराज क्रीडा संकुलात तळीरामांचा वावर, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, साफसफाई नसणे यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. या संकुलात फक्त दोनच सुरक्षा रक्षक असल्याने यात वाढ केली जावी असे निर्देश `फ`प्रभाग क्षेत्र अध्यक्ष साई शेलार यांनी दिले.
प्रभागाच्या सभेच्या विषय पत्रिकेवर डोंबिवली क्रीडा संकुलातील देखभाल दुरुस्ती विषय घेऊन चर्चा करण्यात आली. सदर झालेल्या चर्चेत स्थायी समिती सभापती राहुल दामले, नगरसेवक संदिप पुराणिक, राजन आभाळे,निलेश म्हात्रे, खुशबू चौधरी आदी सदस्य उपस्थित होते.बंदिस्त क्रिडा संकुल,तरण तलाव, नाट्यगृह व खेळाचे मैदानात अनेक असुविधांवर बराच उहापोह झाला. या सर्व असुविधाचे निरीकरण करून योग्य त्या सुविधा पुरवण्यासाठी क्रीडा संकुलातील देखभाल दुरुस्तीसाठी साडे तीन कोटी खर्ची होणार आहे. चर ते पाच सुरक्षा रक्षक
या संकुलात असावे यावरही सदस्यांचे एकमत झाले.