गुन्हे वृत्त

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

ठाणे : दुर्मिळ प्रजातीच्या खवले मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला ११ ऑक्टोबर २०१८ रोजी बेड्या ठोकण्यात आल्या. ही उत्तम कामगिरी पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मिळालेल्या माहितीवरून ठाणे पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभाग, घटक १ च्या पथकाने केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दुर्मिळ खवले मांजराची किंमत 40 लाख रुपये आहे.
खवले मांजर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती हवालदार सुभाष मोरे यांना खबऱ्याने दिली. त्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग घटक १ च्या पथकाने ठाण्यातील बाळकुमकडे जाणाऱ्या पुलाजवळील महालक्ष्मीमंदिरासमोर सापळा लावून देवजी नामदेव सावंत (४२), संजय भोसले (४६), रामदास पाटील (५६) यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १० किलो वजनाचे ९२ सेंमी लांब खवले मांजर आढळून आले. या खवले मांजराची किंमत ४० लाख रुपये आहे.
खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ६६/१८) वन्यजीा संरक्षण कायदा कलम ९, ३, ४८(ए), ४९(ए), ५०, ५१ नुसार गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि संदीप बागुल करत आहेत.
या टोळीचा पर्दाफाश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि रणवीर बयेस, सपोनि समीर अहिरराव, सपोउनि संदेश चौधरी, हवालदार सुभाष मोरे, संभाजी मोरे, पोना सुनील माने, चंद्रकांत वाळुंज, किशोर भामरे आदी पोलीस पथकान केला. या कारवाईत वन विभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल दिलीप देशमुख, वनपाल संजय पवार, वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!