डोंबिवली :- ( शंकर जाधव ) अनेक महिन्यापासून बंद असलेली मोराची गाडी येत्या दिवाळीत सुरु होणार होण्याची शक्यता आहे.त्यामुळे बच्चेकंपनीची दिवाळीतील सुट्टीचा आनंद मोराच्या गाडीवर लुटणार आहे. शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी डोंबिवली पूर्वेकडील श्री गणेश मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची पाहणी केली. यावेळी पालिका सचिव संजय जाधव, प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार,कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत देगलूरकर उपस्थित होते. विशेष म्हणजे मोराच्या गाडीचे डब्बे वाढणार आहेत.
१९९२ पासून डोंबिवली पूर्वेकडील श्री गणेश मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मोराची गाडी सुरु होती. मात्र काही महिन्यांपूर्वी मोराची गाडी सुरु झाल्याने चिमुकल्याना आनंद झाला होता. त्यावेळी सुमारे दोन महिने मोराच्या गाडीवर मूल्य न आकरता लहान मुलांना बसल्यास दिले जाते होते. हे उद्यानाचे सुशोभिकरण आणि नुतनीकरण करण्याचा करार श्री गणेश मंदिर संस्थांशी झाला आहे.शुक्रवारी `फ` प्रभाग क्षेत्राच्या समितीची सभा संपल्यांनंतर स्थायी समितीचे सभापती राहुल दामले. `फ` प्रभाग क्षेत्र अध्यक्ष साई शेलार यांच्यासह नगरसेविका खुशबू चौधरी, नगरसेवक राजन आभाळे, निलेश म्हात्रे,संदीप पुराणिक यांनी उद्यानातील मोराची गाडी पुन्हा सुरु करण्यासाठी पाहणी केली.जुन्या मोराच्या गाडीला २ डब्बे होते.तसेच कमी जागा असल्याने गाडी यु टर्न करताना रुळाला घर्षण होत होते.आता मात्र मोराच्या गाडीसाठी जागा वाढवली जाणार असून एकूण चार डब्बे या गाडीला लावले जाणार आहे. याबाबत स्थायी समिती सभापती राहुल दामले यांना विचारले असता ते म्हणाले. येत्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोराची गाडी सुरु करण्याचा मानस आहे.तसेच उद्यानाचा कायापालट करण्यासाठी श्री गणेश मंदिर संस्थान सुमारे ६० लाख रुपये खर्च करणार आहेत. तर मोराच्या गाडीवर रुफ असावे असे डोंबिवलीतल तरुण नेहाल थोरवडे यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली प्रथमच व्हर्टीकल गार्डन….
उद्यानात आल्यानंतर हिरवी झालर असलेली भिंत पाहिल्यानंतर आपण एका वेगळया जगात आल्याचा अनुभव आता डोंबिवलीकरांना अनुभवास मिळणार आहे. कल्याण-डोंबिवलीत प्रथमच अश्या प्रकारचे उद्यान बनविण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी सांगितले. यापूर्वी नागपूर येथे मेट्रो पिलरवर व्हर्टिकल गार्डन ही संकल्पना राबविण्यात आली होती. तर या उद्यानात बच्चेकंपनीसाठी आकर्षक अशी गॅॅलरी बनविण्यात येणार आहे.