ठाणे

आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून बनविण्यात आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानाचा लोकार्पण सोहळा

  डोंबिवली :- ( शंकर जाधव  )   कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सर्वसामान्य कष्टकऱ्यांकरिता लिहिलेल्या कविता अजरामर झाल्या असून आजही बहिणाबाईंच्या कविता कष्टकरी, पिडीत, सर्वसामान्यांना जगण्याकरिता बळ देणाऱ्या असून त्यांच्या कवितांमधून आजही जगताना नवी ऊर्जा मिळते असे गौरवोद्गार ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून सुशोभित करण्यात आलेल्या सुनील नगर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, या वर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले. आता डोंबिवलीत बहिणाबाई चौधरी उद्यान सुशोभित करण्यात आले. हा एक योग असावा असे सांगून उद्यानाकरीता २५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सुभाष भोईर यांचे अभिनंदन केले. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे, युवासेना जिल्हाअधिकारी दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आदी उपस्थित होते.

            आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून सुशोभित करण्यात आलेल्या या उद्यानांत कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. उद्यानात मध्यवर्ती ठिकाणी गोलाकार शिल्प उभारले असून त्यातून आकाशाला गवसणी घालणारी महिलांची झालेली प्रगती दाखविण्यात आलेली आहे. तसेच संपूर्ण उद्यानात रंगीत दिवे, बहिणाबाईंच्या कवितांची रंगीत भिंत रेखाटण्यात आली आहे व या कविता वाचता याव्यात या करीता एक प्रकारची गॅलरी साकारण्यात आली आहे. तसेच लहान मुलांकरीता खेळणी तसेच ज्येष्ठ नागरिकांना चालण्याकरिता फुटपाथ तसेच आसन व्यवस्था  करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेविका अलका पप्पू म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून ओपन जिम तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्र ८५ एमआयडीसी विभागातील नवचैतन्य नगर येथे बालोद्यान आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून सुशोभित करण्यात आले. दोनही उद्यानांचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सुभाष भोईर यांनी डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून एका उद्यानाचे सुशोभीकरण तसेच माझ्या निधीतून एका उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले असून. एमआयडीसी विभागात गटारे व पथदिव्याकरीता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला असून एमआयडीसी विभागातील रस्त्यांकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. सदर उद्यानांच्या उद्घाटना प्रसंगी शहरप्रमुख राजेश मोरे, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, उपशहर प्रमुख अभिजित थरवळ,जि. प. माजी सदस्य प्रकाश म्हात्रे, स्थानिक नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, जि. प. सदस्य रमेश पाटील, नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे, प्रमिला मुकेश पाटील, माजी नगरसेवक पंढरी पाटील, रवी म्हात्रे, युवासेना तालुका अधिकारी योगेश म्हात्रे, सुमित सुभाष भोईर, विभागप्रमुख अभिजित सावंत, धर्मराज शिंदे, सुखदेव पाटील, नेताजी पाटील, उपविभाग प्रमुख अशोक पगारे, नकुल गायकर शाखाप्रमुख जयंता पाटील, सचिन कोर्लेकर, अनिल म्हात्रे, उपविभाग संघटक नीलिमा मांजरेकर, राम नेमाडे, मालुसरे यांच्यासह विभागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!