डोंबिवली :- इंटरनेटच्या जमान्यात `पत्र` याचा विसर पडत चालला आहे. पोस्ट खाते दुर्लक्षित असताना जागोजागी असलेल्या पोस्टपेट्या आता अडचणीच्या असल्याचे ठेकेदार दाखवीत आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय टपाल दिन जागोजाग साजरा करण्यात आला. मात्र डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे स्थानकातील पोस्टाची पेटीठेकेदाराला दाखविल्याने या ठेकेदाराला जाब कोण विचारणार असे डोंबिवलीकर म्हणत आहे. भुयारी गटाराचे काम सुरु असताना ठेकेदाराच्या कामगारांनी येथील पोस्टाची पेटी जमिनीवर टाकल्याचे दिसते.
कंत्राटदाराकडून हा सरकारी ऐवज येथे निपचित पडल्याचे पाहून अनेक नागरिक आश्चर्य व्यक्त करित आहे. डोंबिवली स्टेशन बाहेर पश्चिम बाजूस काँक्रिटचे काम सुरु आहे. भुयारी गटाराचे काम सुरू आहे.प्रवेशद्वार असल्यामुळे येथुन रेल्वे प्रवाशांची सातत्याने रहदारी सुरु असते. काम सुरु असताना रेल्वे स्थानकातून आत- बाहेर करणाऱ्या प्रवाशांचा त्रास होऊ नये म्हणून ठेकेदारांच्या कामगारांनी पत्रे टाकले आहे. या पत्र्याला आधार म्हणून येथील पोस्टाच्य पेटीला जमीन टाकून आधार देण्यात आला आहे.