मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी महिलेच्या गुप्तांगाला स्पर्श करत अश्लील चाळे करणाऱ्या 29 वर्षीय तरुणाला तुरुंगात धाडण्यात आले आहे. ही कारवाई अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी 14 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी केली.
अंधेरी परिसरात राहणारी 24 वर्षीय महिला मुलगा, भाऊ, दीर, काका व अन्य नातेवाईक असे एकूण 10 जण विरार येथील जीवनदानी मंदिरात नतमस्तक होण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन सर्व कुटुंबीय सायंकाळी 5:17 वाजता विरार स्थानकातून चर्चगेट जलद लोकलमध्ये चढले. गर्दीत जागा न मिळाल्याने सर्व जण उभे होते. अंधेरी येथे उतरण्यासाठी दरवाजाजवळील जागेत उभे असताना प्रवासी गुप्तांगाला विचित्र प्रकारे स्पर्श करत असल्याचे 24 वर्षीय महिलेच्या लक्षात आले. त्या प्रवाशाला महिलेने धक्का देऊन पाठी हात केला असता हात ओलसर झाला. सदर बाब नातेवाईकांच्या लक्षात आणून दिली. नातेवाईकांसह इतर प्रवाशांनी अविजीत विक्रम सिंग (29) याला अंधेरी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.
अश्लील चाळे करून महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी (गु. र. क्र. 1888/18) भादंवि कलम 354 (अ 1) नुसार गुन्हा दाखल करून अविजीत सिंग याला अटक करण्यात आली आहे.