महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा

मराठी भाषा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात ‘वाचनतास’ उपक्रम

  मुंबई, दि. 15 : वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी‘वाचनतास’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वाचनतास’ उपक्रम झाला. श्री. तावडे यांनी यावेळी उपस्थित वाचकांबरोबर श्रोतेहो! या पु.ल.देशपांडे यांच्या  भाषणांचे संकलन असलेल्या पुस्तकाचे वाचन केले.

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, दि. 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या ३ वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

 

पोलीस चौकीमधील वाहतूक पोलिसांना पुस्तक भेट

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने श्री. तावडे यांनी गिरगाव आणि मरीन लाईन्स येथील पोलीस चौकीमधील वाहतूक पोलिसांना पुस्तक भेट दिली. पोलिसांनीसुद्धा स्वत:साठी वेळ काढून विविध पुस्तकांचे वाचन करावे, असे श्री. तावडे यांनी यावेळी येथील पोलिसांना सांगितले.

एस एल ॲन्ड एस एस गर्ल्स हायस्कूलला भेट

मराठी भाषा मंत्री श्री. तावडे यांनी चर्नी रोड येथील एस एल ॲन्ड एस एस गर्ल्स हायस्कूलला भेट दिली. यावेळी मुंबई परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने या शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत श्री. तावडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.

आजच्या काळातही पुस्तक वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देताना श्री. तावडे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येणे अभ्यास करणे हे महत्त्वाचे असले तरी अभ्यासासोबत अवांतर पुस्तके पण वाचा त्यातून तुम्हाला आनंद आणि ज्ञान मिळेल, असे सांगितले. अभ्यास,शाळा यामधून थोडा तरी वाचनासाठी वेळ काढा. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी महिन्यातून एक पुस्तक तरी वाचले पाहिजे. वाचनाची आवड तुम्हाला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांसारखे प्रतिभावंत करेल असे श्री. तावडे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!