आपला देश हा धार्मिक वृतीचा असल्याने अनेक सण येत असतात. अशा वेळी कचर्याचे नियोजन आपल्या घरापासूनच केले गेले पाहिजे. आपल्या घरात ओला कचरा साठवून त्याचे सेंद्रीय खत तयार करण्यासारखे आणि प्रदुषणावर मात करण्याचे घरगुती उद्योग निसर्गाने दिलेले आहेत.पण प्रत्येकाने ते समजून घ्यायला हवेत.पण समजूनच नव्हे तर ते अंमलात आणले पाहिजेत.काही दिवसांपूर्वीच गणपती विसर्जननिमिताने तर कचर्याचे पर्वत नदी- नाले, समुद्रकिनारी दिसून येत आहेत. उत्सवाचे निर्माल्य जमा करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे येत असतात. त्यांच्या कडील निर्माल्य नदी नाल्यात न सोडता भक्तिभावाने या सेवाभावी संस्थांकडे जमा केल्यास प्रदुषणावर नियंत्रण बसू शकेल. आज राज्यात गणेश मुर्तींचे प्रमाण सर्वात आधिक आहेत.त्यामानाने नवरात्रौत्सव सर्वत्र साजरा होत असला तरी देवी कमी प्रमाणावर बसतात.कारण ठराविक मंडळ,संस्थाच देवी बसवतात.
शिवाय प्लॉस्टीक ऑफ पँरीसच्या न विरघळण्यार्या मुतीं वर्षानुवर्षे तशाच पाण्यात पडून राहतात. त्या ऐवजी इकोफ्रेंडली गणेशाच्या/देवीच्या मुर्तीचा वापर करा जेणेकरुन या प्रदुषणाच्या विळख्यात आपलेच गणेश/देवीभक्त अडकणार आहेत त्यांची यातून मुक्तता करायला किंवा याचा विचार करायला काहीच हरकत असणार नाही. समुद्रकिनारी गणेश विसर्जनाच्या वेळी लाखो टन कचरा जमतो.तो उचलण्यासाठी काही सेवाभावी संस्था आणि अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांचा यामध्ये मोठ्याप्रमाणे सेवा तत्वावर हातभार लागतो.
आज प्रत्येक गाव,तालुका,जिल्हा हा प्रदुषणाच्या विळख्यात सापडला आहे.भविष्यात आपली युवा पिढी या देशाचा आधार शक्ती आहे. त्यांचे आत्मबल वाढविण्यासाठी स्वच्छ भारत मिशनला प्रत्येक नागरीकांचे आद्य कर्तव्य असणार आहे. घनकचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक सुज्ञान देशवासीयांनी स्वच्छ भारत मिशनला हातभार लावायला हवा.जेणेकरुन आपण प्रदुषण मुक्त होऊ.
सर्वत्र प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असतानाच त्यात आता घनकचर्याने साथ दिलेली आहे. स्वच्छ भारत या सरकारच्या धोरणावर अजूनही पाहिजे तितका जनतेने विचार केलेला दिसत नाही. स्वच्छ भारत ही आरोग्य वर्धनाची संकल्पना असुन यामध्ये मोठ मोठे होणारे असाध्य आजार आज काही प्रमाणात कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु शहरामधील कचरा हा गुंतागुंतीचा गंभीर प्रश्न बनत चालला आहे. आपल्या चंगलवादी आणि भोगवादी समाजाकडून रोज प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जातो. संपूर्ण जगामधून असा भोगवादी समाजाकडून कचरा एकत्र केल्यास हिमालय पर्वता एवढा नवीन पर्वत तयार होवू शकेल.पण आता हे कुठेतरी थांबायला हवे.घनकचरा ढिगार्यात फेकल्यामुळे शहर आणि गाव यांचे सौंदर्य नष्ट होण्याबरोबर आरोग्य विषयक प्रश्न गंभीर होत आहेत. कचर्याचे ढिगारे रोगजंतूची वाहतूक करणार्या माशा, डास, उंदीर, झुरळ यांचा पैदाशिचे अड्डे बनत आहेत.त्यामुळे अनेक प्रकारची रोगराई पसरताना दिसते.आज शहरातल्या विविध भागातला कचरा सार्वजनिक संस्था गोळा करुन दुरवरच्या ठिकाणी वाहतूक करुन ज्या ठिकाणी जमा केला जातो तेथे जाळून टाकून किंवा कंपोस्ट खतासाठी वापरला जातो. आज देशातील अनेक विकसनशिल शहरात कच-याची बाब आवाक्याबाहेर गेलेली आहे. काही ठेकेदार वाहतूकीचा खर्च कमी करण्यासाठी नदीकिनारी घनकचरा टाकून रोगांना आमंत्रण देत असतात. आज गोळा केलेला कचराही कचरा पेटीच्या बाहेर अस्ताव्यस्त पडलेला असतो. त्याचबरोबर शेजारची जागा कचर्याने व्यापून दुर्गंधी पसरली जाते.हे कशाचे लक्षण म्हणायचे?
कचर्याच्या समस्या दिवसेंदिवस जटील हेात चालल्या आहेत. यामध्ये प्रत्येक घरातील कुटूंब प्रमुखाने आपण निर्माण केलेल्या कचर्याचे ओले – सुके घटक करुन कचरा कुंडीत टाकले पाहिजे. आज प्लँस्टीक बंदीचा बाऊ करुन जागोजागी अजुनही प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा खच पडत आहे. म्हणजेच प्लॅस्टीक बंदी यशस्वी झालेली दिसून येत नाही. अजुनही अनेक शहरामध्ये, आठवडा बाजारामध्ये बिनधास्तपणे प्लास्टीक पिशव्यांचा खुलेआम वापर आणि व्यापार होत आहे.हे कुठेतरी थांबायला हवे.शिक्षित लोक आपण कोठेही कचरा करत आहोत.कचरा टाकत आहोत.पण तोच कचरा अशिक्षित लोक गोळा करुन विल्हेवाट लावताना दिसत आहेत.मग खरं हुशार कोण? याचे उतर साहाजिकच प्रत्येकजण वेगवेगळे देईल यात शंकात नाही.तरीही आपल्याला प्रदुषण मुक्त व्हायचे असेल तर मी कचरा कुठेही टाकणार नाही.दुस-यालाही टाकू देणार नाही अशी प्रत्येकाने शपथ घ्यायला हवी.याची सुरुवात प्रत्येकाने स्वःतापासूनच करायला हवी.असे जर झाले तर महाराष्ट्रातील प्रत्येक वाडीवस्ती, गाव,तालुका,जिल्हा हा प्रदुषण मुक्त झालेला दिसेल यात शंकाच नाही.गरज आहे ती प्रत्यक्ष कृतीची….!